शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

प्रसूतिगृह उदघाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 19, 2016 02:03 IST

शहरातील नूतनीकरण केलेले सरकारी प्रसूतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सात कोटींतून रुग्णालयाचे नूतनीकरण व कामगार निवास इमारत बांधली

उल्हासनगर : शहरातील नूतनीकरण केलेले सरकारी प्रसूतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सात कोटींतून रुग्णालयाचे नूतनीकरण व कामगार निवास इमारत बांधली. ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे होऊनही कर्मचारी, डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येने रुग्णांची गैरसोय होत आहे. महिन्याला ५०० पेक्षा जास्त बालकांचा जन्म येथे होतो, अशी माहिती अधीक्षक डॉ. नरसिंग इंगळे यांनी दिली. उल्हासनगर कॅम्प नंबर-४ परिसरातील सरकारी प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करून त्याचा विस्तार केला आहे. ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे झाले असूनही डॉक्टर व इतर कर्मचारी तेवढेच आहेत. रुग्णालयात कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीणमधून गर्भवती येथे उपचारासाठी येतात. दरमहा ४०० ते ४५०, तर वर्षाला पाच हजारांपेक्षा जास्त बालके येथे जन्म घेतात, अशी नोंद आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच वॉर्डांची संख्याही दुप्पट झाली आहे.राज्य सरकारने बांधकाम विभागांतर्गत प्रसूतिगृहाचे नूतनीकरण सुरू केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तीन मजली इमारत बांधली आहे. नूतनीकरणाचे काम सुरू असताना शस्त्रक्रिया विभाग सोडून इतर विभाग सुरू ठेवण्याची किमया बांधकाम विभागाने साधली आहे. त्यातच एक मजला नव्याने बांधला असून अद्ययावत यंत्रसामग्री पुरवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निवासी इमारत बांधून पूर्ण झाली असून नूतनीकरणाचे काम झाले आहे. प्रसूतिगृहाचे उद्घाटन झाल्यावर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.आर. सूर्यवंशी यांनी प्रसूतिगृह रुग्णालयाच्या ताब्यात दिल्याचे सांगून उद्घाटन बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तर, नूतनीकरणाचे बाह्यकाम झाल्यावर उद्घाटनाबाबतची माहिती वरिष्ठांना देणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. इंगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)