शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयाद्यांवर मतदात्यांचे छायाचित्र गायब

By admin | Updated: February 3, 2017 03:26 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी होणार आहे. त्यानुसार चार प्रभागांचा एक पॅनल असल्याने आपल्या प्रभागात कोण कोणता भाग आहे, त्याठिकाणी कोण

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी होणार आहे. त्यानुसार चार प्रभागांचा एक पॅनल असल्याने आपल्या प्रभागात कोण कोणता भाग आहे, त्याठिकाणी कोण मतदार आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या हाती घेतल्या आहेत. परंतु, त्यातील अनेक याद्यांवर किंबहुना पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध याद्यांवर मतदात्यांचे छायाचित्रच नसल्याने उमेदवारांपुढील पेच मात्र चांगलाच वाढला आहे.ठाणे महापालिका निवडणुकीत काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून शिवसेना-भाजपा युती मात्र तुटली आहे. त्यामुळे शेकडो उमेदवार हे महापालिकेच्या निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. महापालिकेकडूनही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जात असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील आॅनलाईन पद्धतीने सुरु आहे. असे असतांना आता प्रत्येक प्रभाग हा सुमारे २० हजार ५२ हजार पर्यंतचा असल्याने या मतदात्यापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक तर होणार आहेच, शिवाय मतदाता कसा आहे, याची ओळख ही मतदार यादीत असलेल्या छायाचित्रावरुन होत असते. परंतु, पालिकेकडून छापण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये मतदात्यांचे छायाचित्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विकत घेतलेल्या या याद्यांचे करायचे काय असा प्रश्न या उमेदवारांना सतावू लागला आहे. उमेदवारी यादीमध्ये मतदात्याचे छायाचित्र असेल तर त्याच्या पर्यंत पोहण्यासाठी सोईस्कर ठरते. परंतु ते नसल्याने उमेदवारांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातही पालिकेकडून सध्या जी आॅनलाईन यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यातही मतदात्याचे छायाचित्र नसल्याने उमेदवारांची चिंता आणखीनच वाढली आहे. या संदर्भात पालिकेच्या निवडणूक विभागाशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, आॅनलाईनमध्ये फाईल हेवी होत असल्याने अपलोड होण्यास उशिर होत आहे. परंतु ३ फेबु्रवारी नंतर मतदात्याचे छायाचित्रही दिसेल असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)