शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केले युतीला झाली तिहेरी आघाडी: ठाण्यातील महिलेने दिले न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:42 IST

एकीकडे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आमदार अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी विचित्र आघाडी एकत्र आली आहे. त्यामुळे युतीला मतदान केलेले असतांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सत्तेसाठी एकत्र येत असेल तर ही जनतेची फसवणूक आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी याचिका ठाण्यातील प्रिया कुलकर्णी या माहिती अधिकार कार्यकर्तीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

ठळक मुद्देमतदारांची फसवणूक केल्याची भावनामुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखलफसवणूक करणाऱ्या राजकीय पक्षांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

लोेकमत न्यूज नेटवर्कठाणे:राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून महिना उलटला. तरीही महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. काँग्रेस आघाडीला दूर ठेवण्यासाठी मतदारांनी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, एकत्रित निवडणूक लढवूनही युतीची ताटातूट झाली. शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करुन मतदारांची फसवणूक केली जात आहे. याचाच जाब विचारण्यासाठी ठाण्यातील प्रिया चौहान कलकर्णी या जागरुक महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मतदारांची फसवणूक करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.ठाण्यातील कळवा परिसरातील सह्याद्री गृहसंकुलात राहणा-या कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,शिवसेना भाजप युतीने विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढविल्या. निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता प्रस्थापित होईल, याच मानसिकतेतून मतदार राजाने युतीतील शिवसेना भाजपच्या उमेदवाराना मतदान केले. निवडणूकीच्या निकालानंतर निकालानंतर मात्र युती तुटली. सत्तेच्या स्वार्थापोटी दोन्ही पक्षांनी आपल्या स्वतंत्र चुली मांडल्या. गेली महिनाभर चर्चांचे गु-हाळ आणि आरोपांच्या फैरी यांनी जनता मेताकुटीला आली आहे. जनतेचे सर्व प्रश्न बासनात गुंडाळून हे पक्ष एकमेकांना शह काटशह देण्यात रमले आहेत. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत सहभागी होत असल्याने ज्या मतदारानी युतीला मतदान केले त्या मतदारांची घोर फसवणूक झाली आहे. मतदारांचा हा अपमान आहे. त्यामुळे मतदाराची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असेही या याचिकेत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.  या याचिकेवरील सुनावणी येत्या 2 डिसेंबर रोजी होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयPoliticsराजकारण