शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विवेक पंडितांना १४ दिवसांची कोठडी

By admin | Updated: April 27, 2017 23:44 IST

श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित ह्यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाल्या नंतर आज त्यांनी बँजो च्या

हितेन नाईक / पालघरश्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित ह्यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाल्या नंतर आज त्यांनी बँजो च्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत, वाजत गाजत पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यासह स्वत:ला अटक करवून घेतली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी जमीनासाठी अर्ज सादर न केल्याने न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.माजी आमदार विवेक पंडित आणि त्यांच्या समर्थकांनी सोमवारी आयोजित केलेल्या डोहाळजेवण आंदोलनाच्या दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून आपल्याला कार्यालयात धक्काबुक्की केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती. ह्या प्रकरणी पो.नि. संजय हजारे यांनी विवेक पंडित आणि त्यांच्या १८ कार्यकर्ते सह अन्य १९ लोकांविरोधात सरकारी कामात अडथळे निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवणे ई. कलमासह गुन्हा दाखल केला होता. कुपोषण, भूकबळीने होणारे बालकांचे मृत्यू आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनिसांना ५-५ महिने न मिळणाऱ्या मानधना बाबत विचारणा करण्यासाठी जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी ह्यांच्या कार्यालयात गेलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या सोबत केलेले वर्तन हे महाभारतातील द्रौपद्रीचे वस्त्रहरणा प्रमाणे असून तर प्रत्येक युगात सीतेला सत्व परीक्षा द्यावी का लागते? अशी पोस्ट ह्या आंदोलना बाबत टाकण्यात आल्याने विवेक पंडित आणि निधी चौधरी ह्यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. त्यातच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी निषेध मोर्चे काढून काम बंद आंदोलन सुरू करून पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासन आणि श्रमजीवीच्या ह्या भांडणात पोलिसांची गोची झाली होती. निधी चौधरी ह्यांना तक्रार देण्याबाबत विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी अचानक तक्र ार दाखल करण्यात आल्याने हा माझ्या विरोधात कट असल्याचे पंडित ह्यांनी सांगितले. (वार्ताहर)