शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा राज्य वित्त आयोगाची ठाणे जिल्हा परिषदेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:06 IST

तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणि आयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.

ठाणे :  तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणि आयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले. त्याच बरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील सोई-सुविधां बाबतही आयोगाने चर्चा केली.

जिल्हा परिषदेने राबवलेल्या केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून आयोगाला माहिती दिली. आयोगाने जिल्हा परिषदेने राबवलेल्या योजनां बद्दल समाधान व्यक्त केले.आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाचे आर्थिक बळकटीकरण होण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाय योजना करायला हव्यात, त्यासाठी निधीची उपलब्धता कसा प्रकारे करायला हवी  याविषयी संगोपांग चर्चा केली.

यावेळी समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, अंबरनाथ पंचायत समिती सभापती स्वप्नाली भोईर,  जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, पुष्पा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव ,  उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगणे, भिवंडी पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे