शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकांच्या गावात संघर्ष समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:34 IST

२७ गावांचा मुद्दा : विरोधकांशी साधणार संवाद

कल्याण : केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास काही नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली आहे.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक गोपनीय बैठक पार पाडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, गगाजन मांगरूळकर, दत्ता वझे आदी उपस्थित होते.महापालिकेतून २७ गावे वगळू नयेत, अशी मागणी केवळ पाच नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी समितीचे पदाधिकारी संवाद साधणार आहेत. त्यातून गाव वगळण्यास नागरिकांचा विरोध आहे की, तेथील नगरसेवक समितीच्या भूमिकेच्या विरोधात आहे, हे स्पष्ट होईल. संवाद साधण्याची ही प्रक्रिया मंत्रालयात पुन्हा दुसरी बैठक होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.२०१५ मध्ये समितीने महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपने कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले. समितीचा पाठिंबा होता म्हणून हे नगरसेवक निवडून आले.भाजपने निवडणुकीतही फसवणूक केली. तसेच पाच वर्षे गावे वगळण्याचे गाजर दाखविले. आता महाविकास आघाडी सरकारकडून गावे वगळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार काही मंडळी करीत असल्याचा आरोप समितीने बैठकीत केला.पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत२७ गावांबाबत शिवसेनेची भूमिका यापूर्वी वेगळी होती. आता शिवसेना अनुकूल होत असताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका