शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला विकणाऱ्या आठवडी बाजारास जिल्हाधिका-यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 18:48 IST

रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या गांवदेवी मैदानावर दर शनिवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाना ताजा भाजीपाला तोही स्वस्तात देणाºया शेतकºयांचा देखील रोखीने व्यवहार होत आहे. शेतकºयांना मोठे उत्पन्न मिळवून देणारे २२ आठवडी बाजार जिल्ह्यात सुरू आहेत. यापैकी गांवदेवी मैदानावरील आजच्या १०१ व्या आठवडी बाजारास आमदार केळकर यांच्यासह जिल्हाधिका-यांनी खास भेट दिली

ठळक मुद्देगांवदेवी मैदानावरील आजच्या १०१ व्या आठवडी बाजारास आमदार केळकर यांच्यासह जिल्हाधिका-यांनी खास भेट दिलीया बाजारांमध्ये दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला, कांदे - बटाटी, अन्नधान्य, कडधान्य आदी स्वत:त ग्राहकांना मिळाला दीड वर्षांपासून शिरोमणी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार हा उपक्रम हाती घेतला

ठाणे : जिल्ह्यातील सुमारे दीड वर्षांपासून शिरोमणी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्याभरातील २२ आठवडी बाजारात सुमारे दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला व फळांची विक्री झाली. याप्रकारच्या येथील गांवदेवी मैदनावरील १०१ व्या आठवडी बाजारास आयोजक आमदार संजय केळकर व ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भेट देऊन दुकानदारांसह ग्राहकांची विचारपूस केली.अगदी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या गांवदेवी मैदानावर दर शनिवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाना ताजा भाजीपाला तोही स्वस्तात देणा-या शेतक-यांचा देखील रोखीने व्यवहार होत आहे. शेतक-यांना मोठे उत्पन्न मिळवून देणारे २२ आठवडी बाजार जिल्ह्यात सुरू आहेत. यापैकी गांवदेवी मैदानावरील आजच्या १०१ व्या आठवडी बाजारास आमदार केळकर यांच्यासह जिल्हाधिका-यांनी खास भेट दिली. यावेळी तहसीलदार अधिक पाटील, स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, सीताराम राणे, स्थायी समिती माजी सभापती प्रकाश नरसणा, डॉ. राजेश मढवी, संतोष साळुंखे, किरण धत्तूरे, स्वप्नाली साळवी, स्नेहा शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतक-यांसह ग्राहकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.गांवदेवी मैदानाप्रमाणेच उच्चभ्र लोकवस्तीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये देखील हा आठवडी बाजार मंगळवारी भरतो. यानुसार ठाणे शहरात ठिकठिकाणी नऊ आठवडी बाजार सुरू आहेत. कल्याण, डोंबिवली आदी शहरांसह जिल्ह्यात मागील दीड वर्षांपासून २२ आठवडी बाजार सुरू आहेत. या बाजारांमध्ये दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला, कांदे - बटाटी, अन्नधान्य, कडधान्य आदी स्वत:त ग्राहकांना मिळाला आहे. या रोख विक्रीमुळे     शेतक-यांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे वास्तव येथील गावदेवी आठवडी बाजाराचा फेरफटका मारला असता निदर्शनात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी