शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

संकेत देशपांडे यांना ठाण्यातील संगीत कट्ट्यावर गाण्याच्या माध्यमातून वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:14 IST

अभिनय कट्ट्यानंतर ठाण्यातील संगीत कट्ट्यावरहि संकेत देशपांडे यांना गाण्याच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. 

ठळक मुद्देसंकेत देशपांडे यांना संगीत कट्ट्यावर गाण्याच्या माध्यमातून आदरांजलीगायकांनी मैत्रीवर आधारित विविध गायली गाणी संकेतच्या आकस्मित जाण्याने नाट्यसृष्टीचे फार मोठे नुकसान : किरण नाकती

ठाणे : संगीत कट्ट्यावर संकेत यांना आदरांजली वाहताना संगीत कट्ट्याच्या गायकांनी मैत्रीवर आधारित विविध गाणी गायली. या प्रसंगी रसिक आणि कलाकार संकेतच्या आठवणीत भावुक झाले होते.या वेळी संकेतने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती चित्ररूपात दाखवण्यात आली.तसेच संकेतने साकारलेल्या विविध भूमिका लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून संपूर्ण व्यासपीठावर संकेत च्या विविध पात्रांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. या प्रसंगी संकेत वर प्रेम करणारे असंख्य रसिक उपास्थित होते.संकेतच्या आठवणीत ज्येष्ठ नागरिक हि भावुक झाले होते. यंदाचा हा १७ क्रमांकाचा कट्टा होता.

अभिनय कट्ट्याची मुहूर्त मेढ रोवल्यापासून ते तीनशेहून अधिक कट्टे यशस्वी करणारा हरहुन्नरी कलाकार "संकेत देशपांडे" याच्या आकस्मित जाण्याने अभिनय कट्टा तसेच नाट्यसृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आहे.एक उत्तम लेखक,दिग्दर्शक,कलाकार, साहित्यिक आणि त्याहीपेक्षा एक चांगला माणूस म्हणून संकेतची ओळख होती.या शब्दांत अभिनय कट्याचे सर्वेसर्वा किरण नाकती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  या कार्यक्रमात "ये दोस्ती हम नही तोंडेंगे" बेहती हवा सा था वो" "जब दर्द नही था "चलते चलते" तसेच तेरे जैसा यार कहा" हि अजरामर गाणी गात संकेतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.विनोद पवार,किरण म्हापसेकर,राजू पांचाळ,निशा पांचाळ,ज्ञानेश्वर मराठे,प्रणव कोळी,सायली अंगणे, श्रेया वरे या कलाकारांनी गाणी सादर केली. "जिंदगी का सफर है ये" आणि "रूठ के हमसे कहि" हि गाणी गात विनोद पवार यांनी प्रेक्षकांना भारावून टाकले.  या कट्ट्याचे निवेदन कदिर शेख, आदित्य नाकती यांनी केले.दीपप्रज्वलन ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी दाभोळकर  यांनी केले.कदिर आणि आदित्य यांनी निवेदनाच्या माध्यमातून संकेत चा अभिनय क्षेत्रातील जीवन प्रवास उलघडला.संकेत देह रूपाने जरी आपल्यातून गेला असला तरी कलाकार म्हणून तो आपल्या सोबत नेहमीच असेल अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.  या वेळी संकेत च्या स्मरणार्थ "संकेत देशपांडे ग्रंथ संग्रहालय" आपण सुरु करणार अहोत याची आठवण आयोजक किरण नाकती यांनी करून दिली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई