शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज विनय आपटे यांनी रोवले : मंदार देवस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 17:04 IST

सुयश कला क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प मंदार देवस्थळी यांनी गुंफले.

ठळक मुद्दे व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफले मंदार देवस्थळी यांनी विनय आपटे यांचा विषय निघाला की मी भावूक होतो : मंदार देवस्थळीआभाळमाया सारखी मालिका त्यांनी मला दिली : मंदार देवस्थळी

ठाणे: विनय आपटे यांचा विषय निघाला की मी भावूक होतो. मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज त्यांनी रोवले. १९९५ साली बोलाची कढी या मालिकेतून त्यांचे आणि माझे सूर जुळले. त्यांच्या कामाचा आवाका, त्यांची काम करण्याची पद्धत झपाटून टाकणारी होती अशा भावना दिग्दर्शक, लेखक मंदार देवस्थळी यांनी व्यक्त केल्या.सुयश कला क्रिडा मंडळ, ठाणे पुर्व यांच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प दिग्दर्शक, लेखक मंदार देवस्थळी यांनी गुंफले. ही व्याख्यानमाला श्री सिद्धीविनायक मंदिराच्या पटांगणात संपन्न झाली. ते म्हणाले की, माझ्या बाबांना नाटकाची तर आईला सिनेमाची आवड होती. शाळेत वक्तृत्व, गीतपठण, अभिनय अशा स्पर्धांत मी आवडीने सहभागी व्हायचो. अभिनय मला अजून आवडतो हे सांगताना त्यांनी अभिनय ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ज्येष्ठ कॅमेरामन बाबा सावंत यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. कोणत्याही दृश्याचा कसा विचार करायचा, ते प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचवायचे हे मी त्यांच्याकडून शिकत गेलो. सुरूवातीचे सहा महिने मी फक्त त्यांचे निरीक्षण करीत होतो. अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम सांगड त्यांनी घातली. यावेळी विनय आपटे यांच्याबद्दल सांगताना ते भावूक झाले होते. ते म्हणाले की, दिग्दर्शन करीत असताना त्यांना पाहणे हा माझ्यासाठी दुर्दैवाने छोटा काळ राहीला. १९९७ साली अभिनेत्री या मालिकेतील त्यांच्या आठवणी त्यांनी प्रेक्षकांसमोर कथन केल्या. विनय आपटे यांच्या बोक्या सात बंडे, वळवाचा पाऊस, सांगाती, मनामनाच्या व्यथा या साप्ताहीक मालिकांमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून माझे नाव दिले. मी आयुष्यात त्यांना विसरु शकत नाही. आभाळमाया सारखी मालिका त्यांनी मला दिली आणि या मालिकेने मला थोडी वेगळी ओळख करुन दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आशिष जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई