शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

मेट्रो कारशेडचा सर्व्हे गावकऱ्यांनी पुन्हा उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:24 IST

एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता.

ठाणे : एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता. परंतु यामध्ये पुन्हा आमदार प्रताप सरनाईक आणि इतर गावक-यांनी हस्तक्षेप करून तो उधळून लावला. आधी शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन करा, मगच सर्व्हे करा, अशी भूमिका घेऊन जिल्हाधिका-यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.घोडबंदर रोडवरील या प्रकारानंतर एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत लोकप्रतिनिधी व शेतकºयांना विश्वासात घेऊनच सर्व्हे केला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे नंबर २८ (नवीन सर्व्हे नंबर ३०) येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करतात. १८७ कुटुंबे येथे शेती करत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाºयांची संख्या जास्त आहे. काही लोक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरती-ओहोटीचे पाणी शेतात यायचे व यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे. त्यामुळे या परिसरात त्यावेळच्या सरकारने १९६० साली शेतकºयांना एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. १९६० मध्ये १६७ लोकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी ६४ गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली. इतरांना तोंडी भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाºयांनी येथील जमीन दिली, पण कसणाºया शेतकºयांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही.>कारशेडसाठी हवी १०० एकर जागाआता मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मेट्रो कारशेडचे आरक्षण ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी जागेत टाकले आहे. या कारशेडसाठी सुमारे १०० एकर जागा एमएमआरडीएला हवी असून त्यासाठी त्यांचे अधिकारी सोमवारी कारशेडच्या सर्वेक्षणासाठी गेले होते. मात्र, त्यांनी कसल्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचा दावा यावेळी शेतकºयांनी केला.यावेळी स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, युवासेनेचे रवी घरत, संजय पाटील, राम ठाकूर, आदींसह मोठ्या संख्येने गावकरीसहभागी होते.>कारशेडसाठी ओवळा-मोघरपाडा येथे शेतकºयांची जमीन एमएमआरडीएला हवी आहे. परंतु, त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकºयांचे समाधान करा, त्यांना न्याय द्या आणि मगच कारशेडचे काम सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.