शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाईंदरच्या तारोडी ग्रामस्थांचा रस्ता रुंदीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 08:05 IST

भाईंदरच्या तारोडी गावातील ग्रामस्थांनी महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरणास विरोध करत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या तारोडी गावातील ग्रामस्थांनी महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरणास विरोध करत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळी तारोडी ग्रामस्थांनी जाहिर सभेचे आयोजन केले आहे. ग्रामस्थांच्या विरोधात स्थानिक नगरसेवक देखील सहभागी होणार असुन आम्हाला रुंदिकरणाची गरज नसताना महापालिका कोणाच्या इशारायावर आणि कोणाच्या फायद्यासाठी रुंदीकरणाचा घाट घालत आहे ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.भाईंदरच्या डोंगरी गावापासून पुढे तारोडी हे गाव आहे. गावात सुमारे दिडशे घरं असुन ५०० च्या वर लोक वस्ती आहे. आजही गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शेती, भाजीपाला लागवड करतात. तारोडी गावाच्या पुढे धारावी देवी मंदिर आणि चौक धक्का जवळ बालेपीर शाह दर्गा आहे.विकास आरखड्यात १२ मीटरचा रस्ता दर्शवला असला तरी गावातील ग्रामस्थांना सद्याचा असलेला १२ ते १५ फुटाचा रस्ता पुरेसा असुन त्यांची कोणतीही रस्ता रुंदीकरणाची मागणी नाही. धारावी मंदिर ट्रस्टने देखील रस्ता रुंदिकरणाची कोणतीही मागणी चालवलेली नाही. सुमारे सात वर्षां पुर्वी परिसरातील हेरल बोर्जिस यांनी रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न केला होता. पालिकेने कामाची निविदा देखील काढली होती. परंतु ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्याने रुंदीकरणाचे काम गुंडाळावे लागले होते.त्यातच गेल्या महिन्याभरापासून रस्ता रुंदीकरणाच्या हालचाली महापालिकेसह स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता व भाजपाच्या काही स्थानिक पदाधिकारायांनी चालवल्या आहेत. गेल्या महिन्यात येथील दोन घरांच्या कुंपण भिंती पालिकेने तोडुन टाकल्या होत्या. गुरुवारी देखील आ. मेहता व पालिका अधिकारायांनी सर्वेयर सह रुंदीकरणाबाबत पाहणी केली. डोंगरी चर्चची जागा सुध्दा यात बाधीत होत असुन पुढे स्थानिक शेतकरायांची घरं, शेतजमीनी आदी रुंदीकरणात जाणार आहेत. ग्रामस्थांसह त्यांच्या तारोडी डोंगरी येथील मुळ ख्रिश्चन रहिवाशांची सार्वजनिक संस्थने रुंदीकरणास विरोध चालवला आहे.बालाजी खतगावकर (आयुक्त, महापालिका ) - लोकांच्या सहमतीनेच डोंगरी पासुन रस्ता रुंदीकरण करण्यास घेतले आहे. तारोडी ग्रामस्थ जर विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन रुंदीकरणाचे काम करु .हेरल बोर्जिस ( भाजपा मंडळ अध्यक्ष ) - सद्या तरी फक्त डोंगरी पासुन पुढे वेडेवाकडे असलेले वळण पर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. त्याच्या पुढे रस्ता रुंदीकरण होणार नाही असे प्रशासनाकडून समजले आहे.विद्याधर रेवणकर ( ग्रामस्थ तथा धारावी मंदिर ट्रस्टचे खजिनदार ) - धारावी मंदिर ट्रस्टने रस्ता रुंदीकरणाची कोणतीही मागणी केलेली नाही. मंदिर ट्रस्ट आणि तारोडी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून एकत्र आहोत. ग्रामस्थांच्या निर्णया सोबत मी आहे.मॅक्सवेल दालमेत (खजिनदार, तारोडी डोंगरी येथील मुळ ख्रिश्चन रहिवाशांची सार्वजनिक संस्था ) दर्गाच्या दिशेला दिवसा व रात्री अपरात्री हुल्लडबाजी करत भरधाव वेगाने जाणाऱ्यामुळे ग्रामस्थ त्रासले आहेत. गतीरोधक सुध्दा काढुन टाकले गेले. वाढत्या रहदारी सोबत कधी नव्हे त्या गावात चोराया व्हायला लागल्या आहेत. आम्हाला रस्ता रुंदीकरणाची आवश्कता नाही. मग कोणाच्या फायद्यासाठी रुंदीकरणाचा घाट घातला जातोय ?