शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील क्रांती दौड ‘विक्रमगड’ने जिंकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:27 IST

विक्रमगड येथील वनवासी विकास आश्रमच्या ज्ञानेश्वर मोरगा याने सलग दुसºया वर्षीही ‘आपण सारे’ आयोजित ‘रन फॉर चले जाव’ ही क्रांती दौड जिंकली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विक्रमगड येथील वनवासी विकास आश्रमच्या ज्ञानेश्वर मोरगा याने सलग दुसºया वर्षीही ‘आपण सारे’ आयोजित ‘रन फॉर चले जाव’ ही क्र ांती दौड जिंकली. पुरुष गटातील १० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती. ज्ञानेश्वरचाच सहकारी अजित माळी याला त्याने १ मिनिटाच्या फरकाने मागे टाकले. महिलांच्या १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत मुंबईच्या वर्षा भवानी हिने पहिला क्र मांक पटकावला.पुरुष गटात उरण जिमखान्याच्या सुजित गमरे याने तिसरा क्र मांक मिळवला. महिलांच्या गटात वर्षाने ठाण्याच्या माधुरी देशमुख हिला पाठीमागे सोडत ही स्पर्धा जिंकली. ठाण्याच्या गीता राठोड हिने तिसरा क्र मांक मिळवला. या स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व उपनगरे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील जवळपास हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेची सुरुवात खेवरा सर्क ल येथून झाली. या वेळी पॅरा आॅलिम्पिकमधील दुहेरी सुवर्णपदक विजेता आणि नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पद्मश्री किताब विजेते देवेंद्र झझारिया यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यातआला.तसेच विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे, सुमन अगरवाल, सचिव संजय चौपाने, के. वृषाली, आपण सारेचे प्रमुख बाळकृष्ण पूर्णेकर, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पुनीतकुमार, कर्नल (निवृत्त) सुनील माने, ठाणे परिवहन मंडळाचे सदस्य सचिन शिंदे यांनीही विजेत्यांना सन्मानित केले.१८ वर्षांखालील मुलांच्या गटातील रोहिदास मोरगा (पालघर), रोहित मांडवकर (ठाणे), मुकेश बिंद (ठाणे),मुलींमध्ये प्रतीक्षा कुलये (मुंबई), हर्षाली भोसले (ठाणे), दर्शना दांगटे (मुंबई) यांनी तर १५ वर्षांखालील मुलांमध्ये निहार गायकवाड ( मो.ह.विद्यालय), रिषीराज धरणे (मो.ह.विद्यालय), यश शिंदे (लोकपुरम पब्लिक स्कूल)तर मुलींमध्ये दीक्षा सोनसुरकर (अ‍ॅचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब), अदिती पाटील (लोकसिटी ट्रस्ट), कृणाली पवार (रायझिंग स्टार) यांनी बक्षिसे मिळवली.१२ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात सोहम पाटील (लोकपुरम सिटी ट्रस्ट), क्रि श यादव (श्री माँ निकेतन), सोहम मिंडे (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स क्लब) तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी (आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल), रेवा डिसा (रायझिंग स्टार्स), संजना सावंत ( ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड) यांनी विजय मिळवला.