शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार परिसरातील लॉजेस वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 16, 2016 01:39 IST

नालासोपाऱ्यात मॉडेलिंंगच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर लगेचच वालीव येथील

शशी करपे,  वसईनालासोपाऱ्यात मॉडेलिंंगच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर लगेचच वालीव येथील एका अल्पवयीन मुलीला वजे्रेश्वरीच्या लॉजमध्ये नेऊन तिथे तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत लॉजमालकाला अटक केली आहे. मात्र, या घटनांनंतर वसई-विरार परिसरातील विशेषत: वसईच्या किनारपट्टीवरील असंख्य बेकायदा लॉजेसमधील सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांची चर्चा सुरू झाली आहे.नालासोपाऱ्यात राहणाऱ्या रिंकू यादवने मॉडेलिंंगच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीसह दोन मुलींचे लैंगिक शोषण करून ब्लॅकमेलिंंग केल्याची घटना उघडकीस आली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात रिंकू यादव मुलींना वसईच्या सागरी किनाऱ्यावर असलेल्या लॉजेसमध्ये नेऊन तिथे फोटोशूटच्या नावाखाली अश्लील फोटो काढायचा. त्यानंतर बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करीत असे. याप्रकरणी पोलिसांनी एका लॉजमालकाला अटक केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात वालीव येथून एका १७ वर्षांच्या मुलीला वज्रेश्वरीतील लॉजमध्ये नेऊन तिथे चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात वालीव पोलिसांनी वज्रेश्वरी येथील लॉजमालकास अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या लॉजमालकाकडे कसलाच परवाना नसल्याचे उघड झाले आहे. वसईत राहणाऱ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मित्रासह ४ जणांनी वज्रेश्वरी येथील एका लॉजमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ६ जुलै रोजी ही घटना घडली होती. आरोपीपैकी एक जण या तरुणीचा मित्र होता. ज्या लॉजमध्ये बलात्काराची घटना घडली, त्या लॉजमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. लॉजमालकाने आपल्या घराच्या आवारात ८ खोल्या बनवल्या होत्या. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नव्हते. येणाऱ्या ग्राहकाची तो नोंदवही ठेवत नव्हता. एका अल्पवयीन मुलीला ४ जण घेऊन आले, तेव्हाही त्याने रोखले नाही. उलट त्यांना रात्रभरासाठी एक रूम उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.