शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्षांची निवड नूतन वर्षातच; मात्र राजकीय हालचालींना वेग

By सुरेश लोखंडे | Updated: December 28, 2017 18:53 IST

तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां  अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश्चित सांगितले जात नाही

ठळक मुद्देअध्यक्षपदासाठी या आधीही सर्वप्रकारचे डावपेच आखूनही शिवसेनेला ते शक्य झाले नव्हतेभाजपा पुरस्कृत पण सध्या शिवसेनेसोबत असलेल्या सदस्याची एक मोठ बांधण्यासाठी सर्व शक्ती, युक्ती पणालासदस्यांची पळवापळवीदेखील होण्याची दाट शक्यता आहे.सदस्यांना लवकरच गुप्त स्थळी  हलविण्याचे प्रयत्न

ठाणे : दीर्घ कालावधी नंतर अस्तित्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पाचही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड नूतन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ६ जानेवारीपर्यंत सभापती व १५ जानेवारीपर्यंत जि.प.अध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाव्दारे नोटिफिकेशन काढला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या हालचालींचा वेग वाढला आहे.निवडणूक आयोगाकडून या अध्यक्षांसह सभापतींच्या निवडीचे फर्मान काढले जाणार आहे. तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां  अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश्चित सांगितले जात नाही. शिवसेनेला अध्यक्षपदाची खुर्ची जवळची वाटत असली तरी भाजपा मात्र ते सहजासहजी होऊ देणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या दोन्ही पक्षांचे राजकीय धुरंधर वेळप्रसंगी न्यायालयीन दरवाजे ठोठावण्याची अटकळ शोधण्याच्या प्रयत्न दिसून येत आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी या आधीही सर्वप्रकारचे डावपेच आखूनही शिवसेनेला ते शक्य झाले नव्हते. पण यावेळी जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेसह भाजपा सर्व शक्तीपणाला लावणार यात शंका नाही. सत्ता स्पर्धेतील या दोन्ही पक्षांना  राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सदस्यांसह काँग्रेस व भाजपा पुरस्कृत पण सध्या शिवसेनेसोबत असलेल्या सदस्याची एक मोठ बांधण्यासाठी सर्व शक्ती, युक्ती पणाला लावावी लागणार आहे. वेळप्रसंगी या सदस्यांची पळवापळवीदेखील होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सदस्यांना लवकरच गुप्त स्थळी  हलविण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. या दरम्यान त्यांना घरीदेखील संपर्क साधता येणार नसल्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार