शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीमध्ये ज्येष्ठांना मिळाले हक्काचे विरंगुळा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:41 IST

खेळ, वाचन, मोफत समुपदेशनाची सुविधा, आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : मनातील गोष्टी सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा असावी, असे ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच वाटते. पण, शहरात अशी जागा त्यांना मिळत नाही. परिवर्तन महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटकर यांनी अशीच हक्काची जागा ज्येष्ठांना मिळावी, यासाठी ‘जननी आशीष’ या संस्थेत विरंगुळा केंद्र सुरू केले आहे.ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. आपल्यासारखेच समवयस्क या केंद्रात येणार असल्याने त्यांना व्यक्त होण्याची संधीही मिळणार आहे. या कें द्रात कॅरम, बुद्धिबळ, वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. काही ज्येष्ठांना वयोमानानुसार वाचण्यात अडचणी येतात. त्यांना ई-रीडिंगची सुविधाही येथे असणार आहे. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड जोपासता येईल. ज्या ज्येष्ठांना आपल्याकडील कला इतरांना शिकवण्याची इच्छा असेल आणि त्यांना तसा विद्यार्थिवर्ग मिळाल्यास या कट्ट्यावर ते प्रशिक्षणही देऊ शकणार आहेत. त्यामुळे या केंद्रात ज्येष्ठांना आपले छंद जोपासता येणार आहेत. ‘जपू या परंपरा’ या गु्रपतर्फे ३५ महिला एकत्रित येऊन आजी संमेलन भरवतात. या संमेलनाची तालीम करण्यासाठी त्यांना ही जागा उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाणार आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.पाटकर म्हणाल्या, वृद्धांनी वृद्धांसाठी चालवलेले हे केंद्र असणार आहे. या केंद्रात सर्वसुविधा ज्येष्ठांना विनामूल्य पुरवल्या जाणार आहेत. संस्थेने या केंद्रासाठीची जागा तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. हे विरंगुळा केंद्र कसे असावे, यासाठी काही महिन्यांपूर्वी एक सेमिनार घेतले होते. त्यातून काही सूचना आल्या. त्यानुसार, विरंगुळा केंद्राचा आराखडा ठरवण्यास मदत झाली.ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या ‘फेस्कॉम’ संस्थेकडून काही प्रश्न आल्यास ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एखाद्या व्यक्तीला वकिलाची फी देण्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तर त्यांना मोफत सल्ला दिला जाणार आहे. संस्थेत दोन समुपदेशक असणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडेही खूप कलागुण आहेत. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना यानिमित्ताने वाव मिळणार आहे. सर्वांच्या विचारातून हे केंद्र चालवण्यात येणार आहे. ज्येष्ठांसाठी योग व प्राणायामवर्गही येथे होणार आहे. त्यासाठी योग प्रशिक्षक मंगला ओक सहकार्य करणार आहेत. आॅर्थोपेडिक डॉ. प्रसाद भंडारी हे म्युझिक थेरपी शिकवणार आहेत. त्यांच्या कार्यशाळा येथे होणार आहेत.कमिटीची स्थापनाविरंगुळा केंद्रातर्फे एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. ही कमिटी ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ज्येष्ठांना वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात जावे लागते. तेथे जाण्यासाठी कमिटी सहकार्य करणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली