शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे हप्ते भरण्याच्या आमिषाने वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:20 IST

नामांकित कंपन्यांमध्ये वाहने आकर्षक भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्तेही फेडण्याचे प्रलोभन वाहन मालकांना दाखवून त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील अश्फाक नूर अहमद सिद्दिकी उर्फ समीर यास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली.

ठाणे : नामांकित कंपन्यांमध्ये वाहने आकर्षक भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्तेही फेडण्याचे प्रलोभन वाहन मालकांना दाखवून त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील अश्फाक नूर अहमद सिद्दिकी उर्फ समीर यास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ लाख ७२ हजार ५०० रुपयांची चार वाहनेही हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.फसवणुकीने मिळवलेल्या या वाहनांची अश्फाक आणि जाफर यांनी गुजरातमध्ये दीड ते पाच लाखांपर्यंत विक्री केली. या वाहनांपैकी एका वाहनाचा वापर गुजरातमध्ये चक्क दारूच्या तस्करीसाठी होत होता, अशीही माहिती तपासामध्ये समोर आली आहे.वागळे इस्टेट भागातीलएका रहिवाशाची कार भाड्यानेलावून देतो आणि वाहन कर्जाचेहप्ते भरतो, अशी बतावणी अश्फाकने एका वाहनधारकाकडे केलीहोती. प्रत्यक्षात कार ताब्यात मिळाल्यानंतर तिची परस्पर गुजरातमध्ये विक्री केली. या टोळीने सुरुवातीला बँकेचे हप्तेही भरले. पुढे ते भरलेच नाही. त्यानंतर संपर्क क्रमांकही बंद ठेवला. त्यामुळे संशय बळावल्यामुळे संबंधित वाहन मालकाने याप्रकरणी ५ आॅक्टोबर रोजी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाकडून तपास सुरू असतानाच दहिसर पोलिसांनी यातील अश्फाक याच्यासह तिघांना अटक केली. यातील दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा चौथा साथीदार मात्र पसार झाला आहे. या माहितीच्या आधारे ठाणे न्यायालयाच्या आदेशाने अश्फाकचा पाच दिवसांपूर्वी वागळे इस्टेट पोलिसांनी ताबा घेतला. या टोळीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही वागळे इस्टेट पोलिसांनी केले आहे. अश्फाकच्या चौथ्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त निलेवाड यांनी सांगितले.>अश्फाक हाच टोळीचा सूत्रधारअश्फाक या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचीही बाब उघड झाली. वाहनांची गुजरातमध्ये विक्री केल्याची त्याने कबुली दिली. मुंब्य्रातून अशाच प्रकारे फसवणुकीने त्यांनी विकलेल्या दोन आणि मुलुंड येथील एक अशा २२ लाख ७२ हजार ५०० रुपयांची चार वाहने गुजरात येथून हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.