शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

गणेशोत्सवात ठाण्यात वाहन नोंदणीचा उच्चांक, ८ हजार ६०० नवीन वाहनांची नोंदणी

By अजित मांडके | Updated: September 30, 2023 18:09 IST

पेट्रोल वाहनांकडे अधिक कल

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नेहमी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या सणाच्या मुहूर्तावर नव्या वाहन खरेदीसाठी वाहन चालकांचा कल दिसून येतो. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीबरोबर नोंदणीला वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

सप्टेंबर महिन्यात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल आठ हजार ६०० वाहनांची नोंदणी झाली असून हा गणेशोत्सवातील उच्चांक असल्याचे बोलले जात आहे. तर पर्यावरण पूरक वाहन खरेदी करा अशी जनजागृतीवर भर दिला जात असताना, अजून पेट्रोल आणि डिझेल वाहन खरेदीकडे कल असल्याचे दिसत आहे. या वाहनांमध्ये ५ हजार ४२७ वाहने पेट्रोल आणि एक हजार २४२ डिझेलच्या वाहनांचा समावेश आहे. तर २५३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात ( आरटीओ ) मध्ये १ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान ८ हजार ६०० विविध वाहनांची नोंदणी झाली आहे. एकूण २० प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी,चारचाकी आणि बस ,ट्रक आदींचा समावेश आहे. तसेच ही पेट्रोल,डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी, एलपीजी, सोलर या इंधनावर धावणारी आहेत. त्या वाहनांमध्ये प्रवासी किंवा मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे. एकूण वाहनांच्या ५ हजार वाहने ही दुचाकी आहेत. २ हजाराहून अधिक चारचाकी (कार), ३७८ रिक्षा, ६३ बसेस आदी वाहनांचा समावेश आहे.

पेट्रोलची सर्वाधिक वाहने- या महिन्यात नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ५ हजार ४२७ वाहने पेट्रोलवर धावणारी आहेत. यामध्ये ४ हजार ५८६ दुचाकी, ८०३ कार, ३ रुग्णवाहिका अशी वाहनांचा समावेश आहे. तर १ हजार २४२ डिझेल वाहने असून त्यामध्ये ७२५ मालवाहतूक,३७१ कार ,४३ बसेस अशा वाहने आहेत.

२५३ इलेक्ट्रिक वाहने- अजून पेट्रोल- डिझेल या वाहनांची मोठया संख्येत खरेदी केली जात आहे. त्यातुलनेत इलेक्ट्रिक वाहन खरेदीची संख्या कमी आहे. अवघ्या २५३ वाहने खरेदी करून नोंदणी झाली आहे. यामध्ये १९१ दुचाकी,२० बसेस आणि दोन रिक्षा २९ मोटरकार आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच सीएनजी वाहनांची संख्या ही ४६१ इतकी असून त्यामध्ये सर्वाधिक ३७५ रिक्षा आहेत.

टॅग्स :carकार