शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन नोंदणी, लर्निंग लायसन ठाणे आरटी ओत आॅनलाइन

By admin | Updated: March 15, 2017 01:50 IST

वाहन नोंदणी आणि शिकाऊ परवाना देणे, ही परिवहन विभागातील दोन्ही महत्त्वाची कामे आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे.

ठाणे : वाहन नोंदणी आणि शिकाऊ परवाना देणे, ही परिवहन विभागातील दोन्ही महत्त्वाची कामे आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. या विभागाचे कामकाज पारदर्शक होण्यास या प्रक्रियेमुळे मदत होणार आहे.वाहन नोंदणी करण्यासाठी आणि वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना परिवहन विभागाच्या कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. दलालांसाठी सोयीची असलेली ही पारंपरिक प्रक्रिया हद्दपार करण्यासाठी परिवहन विभागाने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी ही कामे आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, त्याकरिता तांत्रिक बदल करण्याची प्रक्रिया राज्यभरातील अनेक कार्यालयांमध्ये वेगात सुरू आहे. सध्या राज्यातील मोजक्या कार्यालयांमध्येच ही कामे आॅनलाईन केली जातात. त्यातही ही कार्यालये एकमेकांशी जोडलेली नसल्याने माहितीचे एका ठिकाणी संकलन होत नाही. नवीन पद्धतीनुसार जुन्या अथवा नवीन वाहन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया आता आॅनलाईन पद्धतीने करता येणार आहे. संबंधित सर्व कागदपत्रांपासून आवश्यक शुल्कही आॅनलाईन भरावे लागणार आहे. परिवहन विभागातील वाहन निरीक्षक केवळ वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करतील. त्याखेरिज अन्य कोणत्याही कामासाठी वाहनधारकांना आरटीओच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. शिकाऊ परवान्यासाठी देखील अशीच पद्धत अवलंबिली जाणार आहे. परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना सर्व कागदपत्रे आॅनलाईन पद्धतीने सादर करून, आवश्यक शुल्कदेखील आॅनलाईनच भरावे लागणार आहे. केवळ वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागणार आहे. ही चाचणी दिल्यानंतर शिकाऊ परवाना नागरिकांना घरपोच मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसातच नव्या पद्धतीने काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)