शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

निवडणूक कामासाठी वाहनांची जुळवाजुळव, मिळाली 150 वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:03 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे. यात या निवडणुकीच्या कामासाठी मनुष्यबळाबरोबरच वाहनांचीदेखील आवश्यकता असते. त्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाकडे सोपवली आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे. यात या निवडणुकीच्या कामासाठी मनुष्यबळाबरोबरच वाहनांचीदेखील आवश्यकता असते. त्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाकडे सोपवली आहे. त्यानुसार, परिवहन विभागदेखील कामाला लागला असून आतापर्यंत महापालिका, नगरपालिका जिल्हा परिषदेच्या सुमारे १५० वाहने निवडणूक कामासाठी रुजू झाली आहेत.ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठीही निवडणूक विभागाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. या तीनही मतदारसंघांसाठी सुमारे दोन हजार वाहनांची आवश्यकता असून ती जमवण्याची व्यवस्था प्रादेशिक परिवहन विभागावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, गाड्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांसह सर्व नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती यांच्या ताफ्यात असलेल्या १२३ गाड्या आतापर्यंत परिवहन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी सुमारे ८३० बस, १०५ कार आणि मतपेट्यांसाठी एक हजार १५९ खाजगी वाहनांची आवश्यकता भासत असल्याने त्यांची जुळवाजुळवही केली जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी लागणारे रथ, प्रचारात असलेल्या गाड्यांची नोंदणी करण्याची तयारीही करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात अडथळा येऊ नये, विनाविलंब काम व्हावे, यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून अतिरिक्त कर्मचारीही नियुक्त केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.दरम्यान, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह जिल्हा परिषद, नगरपालिका, सिडको, पंचायत समित्या आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून आतापर्यंत १४८ वाहने प्राप्त झाली असून ती वाहने प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला वापरली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.तारेवरची कसरततीन लोकसभा मतदारसंघांत १८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात या प्रत्येक मतदारसंघासाठी १० गाड्यांचा ताफा अपेक्षित आहे.त्यानुसार, प्रत्यक्षात १८० ते २०० वाहनांची आवश्यकता असताना केवळ १४८ वाहनेच उपलब्ध झाली आहे.त्यामुळे निवडणुकीच्या कामांसाठी वाहने देताना जिल्हा निवडणूक विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक