शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

वसईत जागर मराठीचा

By admin | Updated: February 25, 2017 03:01 IST

जागतिक मराठी भाषादिनानिमित्त वसईत मराठीचा जागर करण्यात येणार असून ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

वसई : जागतिक मराठी भाषादिनानिमित्त वसईत मराठीचा जागर करण्यात येणार असून ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही शाळांमध्ये जाऊन साहित्यिक आणि कवी विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी प्रवोधन करणार आहेत. ज्ञानपीठ पुरस्काप्राप्त कवीवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वसईत रविवारी सायंकाळी ५ वाजता वाघोली येथील शनी मंदिर सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्र्फेे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पु. द. कोडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी भारत दौंय्ऋ हे प्रमुख वे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक यावेळी प्रमुख पाहुणे असणार आहेत. ज्येष्ठ कवी डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. पल्लवी बनसोडे संगीता सेरेजो, भारती देशमुख, सुरेखा धनावड,े अ‍ॅड. रमाकांत वाघचौडे, महादेव इरकर, हरिहर बाबरेकर आदी विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी प्रवोधन करणार आहेत. निर्मळ येथील जीवन विकास मंडळ’ संचालित ’चेतना पुस्तकालयामार्फत टिव्ही-चित्रपट माध्यमामुळे मराठीला सध्या बरे दिवस?’ ह्या विषयावर मराठी भाषेचे प्राध्यापक तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक श्री. चंद्रकांत पवार ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोली भाषेतील काव्य वाचनात सहभागी स्थानिक कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. रविवार २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व दर्दी रसिकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुनील रॉड्रिग्ज यांनी केले आहे. (प्रतिनिधी)