शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नाताळच्या स्वागतासाठी वसई-विरारकर सज्ज

By admin | Updated: December 22, 2016 05:30 IST

वसई धर्मप्रांतात असलेल्या भिवंडीपासून वसई, पालघर, मोखाडा, तलासरी, विक्रमगडपर्यंतच्या ३५ धर्मग्रामांना ख्रिस्त जन्मोत्सवाचे

वसई : वसई धर्मप्रांतात असलेल्या भिवंडीपासून वसई, पालघर, मोखाडा, तलासरी, विक्रमगडपर्यंतच्या ३५ धर्मग्रामांना ख्रिस्त जन्मोत्सवाचे वेध लागले आहेत. नाताळसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. घराघरात केक आणि फराळ बनवण्यात गृहीणी गुंतल्या आहेत. तर तरुणाई जिंगल बेल आणि सांताक्लॉजच्या माध्यमातून नाताळ गाणी गात नाताळ आगमनाची वार्ता पोचवत आहेत. तर नाताळ गोठा बनविण्याचे काम नेहमीच्या उत्साहाने सर्वत्र सुरु आहे. पालघर जिल्ह्यातील शंभरहून अधिक चर्चमध्ये नाताळ निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत. चर्च आणि घराच्या सजावटीच्या कामांनी वेग घेतला आहे. गृहीणी केक, चॉकेलेटस बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. नाताळ निमित्ताने वसईतील बाजारपेठा गजबजल्या आहेत. यंदाही भारतीय बनवाटींसह चायनीज, पर्शियन आणि कोरीयन उत्पादने मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी आली आहेत. लहान-मोठे सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंंगल बेल, सजावटीच्या वस्तू, कागदी, लाकडी आणि प्लॅस्टिकच्या चांदण्या, चॉकलेटस, म्युझिकल लाईटींग, टेबलक्लॉथ, ग्रिटींग कार्डस, लायटींगच्या वस्तू, रंगीबेरंगी मेणबत्या, नाताळ गोठ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू अशा नानाविध वस्तूंनी बाजारपेठ्या फुलल्या आहेत. ईश्वराने मानवांच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांत ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. इंग्रजीमध्ये नेटिव्हिटी म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म. त्यावरून अपभ्रंश होत नाताळ हा शब्द रुढ झाला असे म्हणतात. आणि ’ख्रिस्ताचा मास’ म्हणजे सामुदायिक इशोपासना यावरून सोळाव्या शतकात ख्रिसमस हा शब्द वापरला जाऊ लागला. खरे तर २४ डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच नाताळ सणाला सुरुवात होते. या संध्याकाळला ख्रिसमस ईव्ह असे म्हणतात. २४ डिसेंबरच्या संध्याकाळी सर्व लहानथोर ख्रिश्चन चर्चच्या आवारात नटून थटून एकत्र येतात. या काळात चर्च दिव्यांच्या रोषणाईने सजवलेले असते. चर्चच्या आवारात ख्रिस्त जन्माचे देखावे तयार केले जातात. विविध रंगाच्या चांदणीच्या आकाराचे आकाश कंदील घरोघरी लावले जातात. यालाच डेव्हिडचा तारा असे म्हटले जाते. मिष्टान्न म्हणून विविध प्रकारचे केक्स, डोनट्स बनवले जातात. याबरोबरच परस्परांना भेटवस्तू देणे, शुभेच्छापत्र पाठवणे, फटाक्यांची आतषबाजी करणे इत्यादी प्रथा जगभरच पाळल्या जातात.ख्रिसमस ईव्हच्या दिवशी संध्याकाळपासूनच चर्चच्या आवारात जमलेले ख्रिश्चन बांधव नाचगाण्यात मशगूल होतात. याच दिवशी रात्री बारा वाजता चर्चमध्ये घंटानाद केला जातो. तो ऐकताच जमलेला जनसमुदाय परस्परांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. खास नाताळसाठी म्हणून भक्तिगीते रचली जातात. त्यांना ख्रिसमस कॅ रोल्स असे म्हणतात. ती गात लहानमुले, युवकयुवती रात्री १२ ते ४ पर्यंत एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. येशूच्या पाळणाघराचे दृश्य प्रथम तयार करणाऱ्या सेंट फ्रान्सिस यांनीच पहिली कँ रोल्सही तयार केली. त्यांना कॅ रोल्स प्रथेचा जनक म्हटले जाते. तेराव्या शतकात इटलीमध्ये प्रथम कॅ रोल्स गायनाची प्रथा सुरु झाली. २४ डिसेंबरच्या रात्रीपासून चर्च व घरोघरी दिसणाऱ्या पाळणाघराच्या दृश्याबरोबरच रोषणाई केलेला ख्रिसमस वृक्षही सर्वत्र पहायला मिळतो. फर नावाच्या वृक्षाची ती प्रतिमा असते. फर हा वृक्ष सदा हरित असतो. तसेच त्याचा आकार चर्चच्या शिखरासारखा वर निमुळता होत गेलेला असतो. म्हणून ख्रिसमस वृक्ष म्हणून फरच्या झाडाला मनाचे स्थान दिले जाते. सफलतेचे प्रतिक म्हणून त्याची पूजा सर्वत्र केली जाते. सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने जर्मनीतील स्वत:च्या घरात मेणबत्त्यांनी सजवलेला फर वृक्ष उभा केला. तेव्हापासून ही प्रथा सर्वत्र रुढ झाली.नाताळ सणाचे आणखी आकर्षण म्हणजे ’सांताक्लॉज’. चौथ्या शतकात आशिया मायनरमध्ये सेंट निकोलस नावाचे बिशप होते. स्थूल शरीर, पांढरीशुभ्र दाढी आणि सदैव हसतमुख असलेले हे बिशप सत्कृत्ये आणि मुलांबद्दलचे अपार प्रेम या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. सांताक्लॉजच्या रुपाने नाताळ सणात त्यांची आठवण काढली जाते. ख्रिसमस ईव्हच्याच दिवशी घरातील मुले झोपण्यापूर्वी घरातील प्रमुख ठिकाणी पायमोजे लोंबत ठेवतात. रात्रीच्या वेळी सांताक्लॉज धुरांड्यातून उतरून पायमोज्यात खेळणी, खाऊ, पोषाख अशा नाना वस्तू ठेवून जातो अशी मुलांची समजूत करून दिली जाते. या सांताक्लॉजला इंग्लंडमध्ये फादर ख्रिसमस तर हॉलंडमध्ये सेंट निकोलस असे नाव आहे. (प्रतिनिधी)पोर्तुगीज मिशनरी वसईत आल्यानंतर १५४८ सालानंतर वसईमध्ये चर्च उभारण्यात आली. यात प्रथम किल्लयात चर्चेस उभारली गेली. पुढे धर्माकडे आकर्षित होऊन अनेक लोकं ख्रिस्ती धर्माकडे वळू लागली. ख्रिस्ती धर्म स्वीकारून चर्च तसेच प्रार्थनेत सहभागी होऊ लागली. परिसरातील लोकांचे आकर्षण लक्ष्यात घेऊन मिशनरी यांनी वसई परिसरात चर्च उभारली. यात मिस्साबरोबर प्रामुख्याने चर्च उत्सव, ईस्टर तसेच नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जाऊ लागले. मराठा राजवट वसईत आली तरीही हे उत्सव साजरे होतच होते. नाताळच्या दिवशी दुपारी मराठा सैन्य मैदानात घोड्यांची शर्यत, तालीम असे विविध कार्यक्रम सादर करायचे असा उल्लेख इतिहासात आहे. धर्म बदलले मात्र संस्कृती तसेच फराळाची पद्धत व चव तीच राहिली जी आजवर चालू आहे. दिवाळीला जसा फराळ केले जातो तसाच फराळ नाताळ केक, गोडधोड पदार्थ बरोबर एकमेकांच्या घरी देण्यात येतो. यात कुठलाच जात-धर्म आड येत नाही. दिवाळी सण पहिला येत असल्याने देणें तर नाताळ सणाला परत येणें या प्रेमळ नात्याने सर्वच लोक नाताळ सणामध्ये सहभागी होत असतात. चर्च तसेच गाव पातळीवर विविध स्पर्धात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा सादर केला जातो. गावातील युवक विविध ज्वलंत विषयावर नाताळ देखावा उभा करतात. यासाठी अनेक सामाजिक संस्था स्पर्धाही आयोजित करून युवकांना प्रोत्साहन देत असतात. अनेकांच्या घरी देखील नाताळ देखावा तयार केला जातो. आकर्षक रोषणाई केली जाते. जणू वसई दिव्यांनी उजळून निघते. विविध गावातून पारंपरिक वेषभूषेतून नाताळ कार्निवल निघते. उत्तर वसईत कुपारी महोत्सव आकर्षित करणारा ठरतो. परदेशात कामानिमित्ते असलेले वसईकर या काळात आपल्या मायदेशी परतून या आनंदात सहभागी होत असतात. नाताळ गीतांनी परिसर संगीतमय झाला आहे. तसेच नाताळ खरेदीला जोर येत आहे. युवकांनी विविध आकर्षक टॅटू तसेच आपली नखें कलामध्ये सांताक्लॉस तसेच नाताळ सजावट रेखाटली आहे.