शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:39 IST

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड : २६ चालकांवर निलंबनाची कारवाई

वसई : महानगरपालिकेची परिवहन सेवा खिळखिळी झाली असून दररोज तिच्या १० ते १२ बस बंद पडत आहेत.भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत ही सेवा चालविण्यात येते. तिच्या दररोज १० ते १२ बसेस नादुरुस्त होत असल्याचे खुद्द परिवहन विभागाच्या व्यवस्थापकांकडूनच सांगण्यात आले. अनेक चालक भरधाव बस चालवत असून परिवहन विभागाने २६ बसचालकांना निलंबित केले आहे तर ३८ जणांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.

या बस धूर ओकणाऱ्या आणि खिळखिळ्या झाल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चालक बसेस भरधाव आणि बेदरकारपणे चालवत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

गेल्या सहा वर्षांत परिवहनच्या बसेसना ४४ मोठे अपघात झाले असून त्यात १८ जणांचे बळी गेले, तर २६ जण जखमी झाले. या सेवेत एकूण १४९ बस असून त्यामध्ये ३० महापलिकेच्या तर ११९ भागीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आहेत. दररोज १३८ बस रस्त्यावर धावतात, त्यांच्या एकूण ८०० फेºया होतात. मात्र अनेक बस रस्त्यात बंद पडतात, अशी तक्र ार प्रवाशांनी केली आहे.

या बस धूर ओकणाºया आणि योग्य दर्जाच्या नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. बहुतांश बसचे इंजिन बंद पडत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

बसेसप्रमाणे त्यांचे चालक आणि वाहक हेदेखील सौजन्यशील नाहीत, उद्धटपणे वागणे, बोलणे, प्रवाशांचा पाणउतारा करणे, सुट्टे पैसे न देणे, चिल्लर जवळ न ठेवणे असे प्रकार सतत घडत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.प्रवाशांकडून रोजच तक्रारीवसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्यावतीने व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. २० दिवसांत ३२ तक्र ारी व सूचना आल्या आहेत. बस वेळेवर न पोहोचणे, चालकांचे उर्मट वर्तन, भरधाव गाडी चालवणे, बसमधील आसने नीट नसणे, थांब्याच्या पुढे बस थांबवणे अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या आहेत.या तक्र ारींचे निवारण नित्य करण्यात येत असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार