शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन; ठिकठिकाणी साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:58 IST

वृक्षही कोसळले, रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल, बळीराजा सुखावला

ठाणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, धरणसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले.शहरात सायंकाळी चारपर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वेगाड्याही उशिरा धावत होत्या. सायंकाळनंतर पाऊस ओसरला होता. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती. मात्र मंगळवार रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळीसुद्धा जोरदार पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील श्रीरंग विद्यालयाजवळ झाड कोसळले, तर आरटीओ आॅफिस येथेही झाडाचा काही भाग कोसळला. मुंब्रा, खारेगाव, दिव्यासह ठाण्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. टिटवाळा, शहाड, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथेही पावसाचा चांगला जोर होता.

या पावसाने बळीराजा सुखावला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभराच्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. ठाणे, कल्याण, कसारा, कर्जत येथील गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक ८३ मिमी पावसाची तर, सर्वात कमी मुरबाडमध्ये १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये १३ मिमी, कल्याणमध्ये ४.०२ मिमी, भिवंडीत ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात मागील २४ तासात पाऊसच झाला नसल्याची नोंददेखील करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने अजून हवी तशी हजेरी न लावल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांवर गेल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस