शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 05:02 IST

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे. हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाला तडे गेले असून रेलिंगही गायब झाले आहेत. तसेच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा पूल धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.वांगणी - पाषाणे पूल हा अंबरनाथ तालुक्यात येत असला तरी कर्जत तालुक्यातील कळंब, सालोख, माले, आर्ढे, पाषाणे, खाड्याचा पाडा आदी गावातील नागरिक या पुलावरून प्रवास करतात.उल्हासनदी बारमाही वाहणारी असल्यामुळे आणि पावसाळ्यात इतर नद्या मिळत असल्याने दुथडी भरून वाहत असते. अशा परिस्थितीत अनेक गावांना जोडणारा हा पूल बांधण्यात आला आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे.पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने पुलाचे स्टक्चरल आॅडिट केल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. तसेच अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणे