शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वंचितांचा रंगमंचा'त संवेदनशील परिवर्तनवादी नागरिक घडविण्याची ताकद!  'युवा नाट्य जल्लोष'ने गाजवली ठाणेकरांची संध्याकाळ!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:34 IST

 ठाणे : "चार्ल्स डिकन्स, मॅक्झीम गाॅर्की या सारखे जागतिक किर्तीचे साहित्यिक व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतीचा सामना करत, स्वतःच्या दाहक अनुभवातून शिकत सवरत पुढे आले व त्यांनी अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. तिच क्षमता वंचितांच्या रंगमंचाव र व्यक्त होणा-या एकलव्य विद्यार्थ्यांच्या लेखनात, आकलनात व अभिव्यक्तीमधे असून त्यातून अधीक संवेदनशील नागरिक भविष्यात घडविण्याची ...

ठळक मुद्देयुवा नाट्य जल्लोषने गाजवली ठाणेकरांची संध्याकाळलोकवस्त्यांमधील समस्यांचे युवकांनी केले प्रभावी सादरीकरण!सामाजिक - कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग व पाठींबा!

 

ठाणे : "चार्ल्स डिकन्स, मॅक्झीम गाॅर्की या सारखे जागतिक किर्तीचे साहित्यिक व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतीचा सामना करत, स्वतःच्या दाहक अनुभवातून शिकत सवरत पुढे आले व त्यांनी अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. तिच क्षमता वंचितांच्या रंगमंचावर व्यक्त होणा-या एकलव्य विद्यार्थ्यांच्या लेखनात, आकलनात व अभिव्यक्तीमधे असून त्यातून अधीक संवेदनशील नागरिक भविष्यात घडविण्याची क्षमता आहे" , असा विश्वास ठाण्यातीर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. विकास हजिरनीस यांनी काल ठाण्यात व्यक्त केला.

                 सुप्रसिद्ध साहित्यिक व रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी, "यावेळी कलाकारांनी दाखवलेली समज, विषय समजून घेण्यासाठी केलेले संशोधन व कविता, संगीत आदींचा  केलेला चपखल वापर" यासाठी एकलव्य कलाकार- कार्यकर्त्यांचे कौतूक केले. लघुपटकार प्रा. संतोष पाठारे यांनी, "वंचित युवकांनी आपल्या प्रभावी मांडणीतून सर्वांना निशब्द व सून्न करून सोडल्या"ची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती मोकाशी यांनी "या नाटिका ठाणे शहरभर दाखवून जागरणाची चळवळ बळकट करण्याचे" आवाहन केले. समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था आयोजित 'युवा नाट्य जल्लोष' या उपक्रमात विविध लोकवस्त्यांमधील एकलव्य विद्यार्थ्यांनी "आमची वस्ती! आपले शहर!" या संकल्पनेवरील पाच आशयघन नाटिका सादर केल्यावर हे सर्व मान्यवर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. यंदा या लोक युवा महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. काॅम्रेड गोदुताई परूळेकर उद्यानातील खुल्या रंगमंचावर या नाट्य जल्लोष ला दाद देण्यासाठी ठाणेकरांनी हाऊस फुल्ल उपस्थिती दाखवल्याबद्दल संयोजक हर्षदा बोरकर यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लतिका सु. मो. यांनी 'एकलव्य सक्षमीकरण योजने'ची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मं. गो. यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

 

 लोकवस्त्यांमधील समस्यांचे युवकांनी केले प्रभावी सादरीकरण!

 

            यावेळी ठाण्यातल्या विविध लोकवस्तीमधील युवा एकलव्य विद्यार्थ्यांनी त्यांना जाणवणारे वस्तीमधील विविध प्रश्न, त्यांनी स्वतःच बसवलेल्या विविध नाटिकांमधून साकारले. आपल्या वस्तीत अत्यंत हलाखीचे व तिरस्करणीय आयुष्य जगणा-या तृतीयपंथीय किन्नर समाजाचे हलाखीचे जगणे दिपक वाडेकर या हरहुन्नरी कार्यकर्ता कलाकराच्या संयोजनात मानपाड्याच्या गटाने उभे केले होते. वस्तीत जोपासला जाणारा सांप्रदायिक सलोखा, अलिकडच्या काळात राजकारणी वा धर्माचा दुरूपयोग करणा-या संघटना कशा संकटात टाकत आहेत, हे मुकनाट्याद्वारे कळवा गटाने अजय भोसलेच्या संयोजनात अनोख्या रितीने व प्रभावीपणे सादर केले. "एक पाऊल स्वच्छतेकडे" या नाटिकेत उथळसर राबोडी गटाने,  सफाईची जबाबदारी केवळ सफाई कर्मचा-यांची नाही तर सर्व नागरिकांची आहे, हे बिंबवले. ओंकार जंगम व आतेश शिंदे यांनी या गटाचे संयोजन केले. सावरकर नगरच्या गटाने शहरातल्या तलावांचं आक्रसत जाणं व त्यासोबतच पारंपारिक कोळी समाजाला विकासाच्या नावाखाली बेदखल करत जाणं, हे अनुजा लोहारच्या संयोजनाखाली प्रभावीपणे सादर केलं. किसन नगर गटाने त्यांच्या 'चिखल' या नाटिकेतून मराठी कवितांमधे व्यक्त होणा-या वस्त्या सादर केल्या आहेत. विश्वनाथ चांदोरकर या कसलेल्या रंगकर्मीने या गटाचे संयोजनात केले होते. तलाव आणि किन्नर नाटकांसाठी ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शहर नियोजन तज्ज्ञ मयुरेश भडसावळे, सावरकर नगर गटासाठी संस्थेच्या हितचिंतनक सविता दळवी, कळवा गटासाठी ठाणे आर्ट गिल्ड चे संजीव तांडेल तर उथळसर - राबोडी गटासाठी टॅग  धनश्री करमरकर यांनी एकलव्य कलाकारांना नाट्यकृती प्रभावी बनविण्यासाठी सरावाच्या दिवसात मोलाचे मार्गदर्शन केले. 

 

सामाजिक - कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग व पाठींबा!

 

          सामाजिक व नाट्य - चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा नाट्य जल्लोषला उपस्थित राहून या उपक्रमास पाठिंबा जाहीर केला. यामधे मुंबईहून खास आलेले प्रकाश राणे, शुभांगी जोशी, हेमंत अणावकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, मतदाता जागरणचे अविनाश मोकाशी, नाट्यकर्मी सुयश पुरोहित, विद्या हजिरनीस तसेच समता विचार प्रसारक संस्थेच्या मनिषा जोशी, कल्पना भांडारकर, सुनील दिवेकर, निलेश दंत, सीमा श्रीवास्तव, संजय निवंगुणे, राहूल सोनार आदी उपस्थित होते. एकलव्य विद्यार्थ्यांचे पालक, मित्र परीवार व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई