शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजही अनेक शहरांत लसीकरणाचे वाजणार तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 23:27 IST

अवघ्या ४० हजार ७०० लसी शिल्लक : ठाण्यातील लसीकरण बंद

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणांची केंद्रे बंद केली आहेत; तर काही ठिकाणी केंद्रांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात बुधवारी ५६ पैकी अवघी २६ केंद्रे सुरू होती. तर गुरुवारी ते बंद राहणार आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील केंद्रदेखील बंद होते. ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांच्या ठिकाणी तुरळक साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात कोविशिल्डचा अवघा २६ हजार ९२०; तर कोव्हॅक्सिनचा १३ हजार ७८० लसींचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा आरोग्ययंत्रणेला गुरुवारी अनेक केंद्र बंद ठेवावी लागणार असून लसीकरणाचे तीनतेरा वाजणार आहेत.

ठाण्यासह इतर जिल्ह्यांतील इतर महापालिकांनीदेखील लसींचा साठा मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. सध्या भिवंडीकडे कोव्हॅक्सिनचे ४५०, तर कोविशिल्डचे एक हजार ७०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे ११० आणि कोविशिल्डचे तीन हजार ८०० डोस शिल्लक आहेत. 

कल्याण-डोंबिवलीत कोव्हॅक्सिनचे एक हजार २९० डोस असून कोविशिल्डचे एक हजार ८४० डोस, मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे तीन हजार १२०, कोविशिल्डचे पाच हजार, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे चार हजार ४७० व कोविशिल्डचे तीन हजार ३६० डोस शिल्लक आहेत; तर उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सिनचे ८००, कोविशिल्डचे दोन हजार ७३० डोस शिल्लक आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोव्हॅक्सिनचे तीन हजार ५४० आणि कोविशिल्डचे आठ हजार ४९० डोस शिल्लक असल्याची माहिती समोर आली.  त्यातही याच शिल्लक डोसमधून बुधवारी लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आज, गुरुवारी लसींचा साठा मिळाला नाही तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ स्थानिक  प्रशासनासमोर येणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे