शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक-शिक्षकेतरांचे आजपासून दोन दिवस लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २७ व २८ ऑगस्ट रोजी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेतले ...

ठाणे : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २७ व २८ ऑगस्ट रोजी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेतले आहे. यानुसार जिल्ह्यातील गांवखेड्यात जिल्हा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शुक्रवारपासून यास प्रारंभ करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शाळा लवकर सुरू करायच्या आहेत. त्यासाठी हे नियोजन केले आहे. त्यातील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्यादरम्यान जिल्ह्यातील सर्व शासकीय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केद्रांवर शासकीय आणि खासगी शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.

या मोहिमेदरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक विभागात कार्यरत असल्याचे कार्यालयीन ओळखपत्र लसीकरण केंद्रावर दाखवणे आवश्यक आहे. या ओळखपत्रावर तत्काळ लसीकरण करता येईल. याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.