शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी केवळ ८० कुप्यांमुळे लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:54 IST

सायंकाळी ५० हजार लसींचा साठा मिळाल्याने शनिवारी पुन्हा होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोना लसीकरण मोहीम लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी थांबली. गुरुवारी (दि. २२) ठाणे महापालिकेला मिळालेल्या लसींपैकी केवळ ८० लसींच्या कुप्या शिल्लक असल्याने शुक्रवारी लसीकरण ठप्प झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यासाठी ५० हजार कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला. त्यामुळे शनिवारी पुन्हा लसीकरण सुरू होईल. मात्र केंद्रे कमी प्रमाणात सुरू असतील.दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयातील बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अनेक औषधालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी शासनाकडून आवाहन केले जात आहे. असे असताना, दुसरीकडे मात्र, लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी उपलब्ध असलेल्या ५६ हजार लसींच्या साठ्यातून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र, शुक्रवारी लसींचा साठ उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे दिसून आले. ठाणे महापलिका आरोग्य विभागाकडे अवघा ८० लसींचा साठा उपलब्ध असून त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे ३०, तर कोव्हीशिल्डचे ५० डोस उपलब्ध होते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून शुक्रवारी अवघ्या पाच लसीकरण केंद्रांच्या माध्यामतून लसीकरण सुरू होते.

ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ५० हजार लसी ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी लसींच्या अभावी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यासाठी ५० हजार कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेला १० हजार, कल्याण-डोंबिवलीला सात हजार, उल्हासनगरला चार हजार, मीरा भाईंदरला सात हजार, नवी मुंबईला १२ हजार आणि सिव्हिल आणि ग्रामीण क्षेत्रासाठी १० हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शनिवारपासून पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या