शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनवासीय विजेच्या लपंडावाने त्रस्त; उन्हाळ्यात गरमीनं लोक हैराण

By धीरज परब | Updated: May 24, 2024 18:13 IST

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात, पण कुणाचं बिल राहिलं तर वीज कापतात.

मीरारोड - यंदा उन्हाळा तीव्र असल्याने आधीच उकाड्याने त्रासलेल्या उत्तनवासियांना गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोबाने आणखी जाच सहन करावा लागत आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील मच्छीमार , शेतकरी आणि अन्य रहिवाशी हे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त आहेत . येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले कि , गेल्या ४ दिवसां पासून विजेचा लपंडाव सुरु आहे . वीज येते - जाते . त्यातच काल रात्री एका विजेच्या लाल बॉक्स मध्ये स्फोट सारखे जाणवल्याने लोकं घाबरली .  दिवसा तर वीज जात असतेच पण रात्री देखील वीज गुल होत असल्याने लोकांची उकाड्यामुळे झोप उडाली आहे .  

एस्टेलिना तानिया यांनी सांगितले की, दिवसाच्या वेळेत बऱ्याचवेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास येत नाही . गुरुवारी सायंकाळी वीज गेली ती रात्री साडे दहाच्या सुमारास आली . पुन्हा पावणे बारा वाजता गेली ती मध्यरात्री १ वाजता आली. वीज नसल्याने घरात उकाडा असह्य होतो व झोप मिळत नाही . ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत त्यांना गरमी मुळे बाळांचे हाल व रडणे सहन होत नाही . 

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात . एखाद्याचे बिल राहिले तर वीज कापतात . पण उत्तन भागातील बहुतांश नागरिक वेळेत वीज बिल भरत असताना सातत्याने विजेचा लपंडाव का सहन करायचा ? वीज गेल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था कंपनीने केली पाहिजे . ह्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच पण व्यावसायिकांना सुद्धा वीज गेल्याने फटका बसतो असा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला .