शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आपला शब्द जपून वापरावा : डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा कवींना कानमंत्र

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 2, 2023 16:20 IST

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहर शाखा आणि कोमसाप युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या ‘राजधानीतील कवी आणि कविता' या कार्यक्रमात पवार बोलत होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या परिसरात, भोवताली काय चालले आहे, पुढे काय होईल याची जाणीव समाजाला करून देण्याचे मोठे काम कवी आणि लेखक करत असतात. आपला शब्द जपून वापरावा, हे सगळ्यात मोठे आव्हान आजच्या कवींसमोर आहे. फेसबूक, व्हॉटस् अपसारख्या सोशल मिडीयामुळे ते फार लवकर प्रसिद्ध होतात. झट की पट कविता, झट की पट प्रसिद्धी त्यांना मिळते असा कानमंत्र ज्येष्ठ कवियित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आजच्या कवींना दिला. 

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहर शाखा आणि कोमसाप युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या ‘राजधानीतील कवी आणि कविता' या कार्यक्रमात पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या तीस-चाळीस वर्षांचा अनुभव मला सांगतो, की हा मार्ग खूप सोपा असला तरी कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यभर पसरलेल्या मराठी वाङ्मयीन व्यवहाराचे विकेंद्रीकरण व्हावे, या भावनेनेच मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

कोमसाप हा एक वटवृक्ष आहे. त्याच्या असंख्य पारंब्यांमधून साहित्याो एक मोठंे झाड लांबवर पसरल्याचे त्या म्हणाल्या.  यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, कोमसाप शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य, युवाशक्ती अध्यक्षा प्रा. दीपा ठाणेकर, कोमसाप कार्याध्यक्षा नितल वढावकर उपस्थित होते. कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, प्रसिद्धीप्रमुख जयु भाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य यांनी प्रास्ताविक केले. कविता लिहिताना तुम्हाला जे दिसते, जे सुंदर आहे ते सगळे बाहेरचे न लिहिता, मनामधले काय लिहिता, हे महत्त्वाचे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी कोमसाप राजधानी पुरस्कार प्राप्त काही कवींच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा राजपूत यांनी केले.