शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"राज्य सरकारच्या करिअर पोर्टलमध्ये उर्दू भाषेचा समावेश करावा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:25 IST

रईस शेख यांची मागणी : शालेय शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट

भिवंडी : भिवंडी मनपा शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा व येथील शिक्षकांबरोबरच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख प्रयत्नशील असून याबाबत नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी भिवंडीतील मनपा शाळांमधील शैक्षणिक सुविधा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार शेख यांनी चर्चा केली. त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता सुरू केलेल्या करिअर पोर्टलबाबत सूचनाही केल्या.करिअर पोर्टलमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक प्रकारच्या शिष्यवृत्यांविषयी माहिती तसेच विविध महाविद्यालये यांविषयी इत्यंभूत माहिती मिळत असून ही माहिती एकूण आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अशा या अतिशय महत्त्वाच्या करिअर पोर्टलची माहिती उर्दू भाषेमध्ये उपलब्ध नसल्याने शेख यांनी खंत व्यक्त केली. मराठी आणि इंग्रजी पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शाळांची संख्या असणाऱ्या उर्दू भाषिक विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता शासनाच्या महत्त्वाच्या माहिती पोर्टलपासून विद्यार्थ्याचा मोठा वर्ग वंचित राहत असून या पोर्टलवर उर्दू भाषेचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शेख यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली.भिवंडी निजामपूर शहर महापालिका हद्दीतील महापालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असताना इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असून शिक्षकांअभावी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब शेख यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज असतांनाही बांधकाम अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. तसेच मनपाच्या अनेक शाळा इमारतीची दुरवस्था झाली असून त्या अनेक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सुसज्ज इमारतींसाठी निधी द्यावाया धोकादायक इमारती पाडून त्या जागेवर नव्या सुसज्ज शाळा इमारत बांधण्यासाठी मनपा प्रशासनाला निधी व निर्देश देण्यात यावे तसेच इमारत बांधकाम करतांना येणाऱ्या अडचणी शासन स्तरावरून सोडवाव्या तसेच मुख्याध्यापक पदोन्नती २०१४ पासून दिली गेली नाही ती देण्यात यावी अशा विविध मागण्या आमदार रईस शेख यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केल्या आहेत. काही मागण्या मान्य करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले.