शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

कल्याणजवळील पठार पाड्यातील दुर्लक्षित आदिवासी असुरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

By सुरेश लोखंडे | Updated: November 30, 2017 18:23 IST

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते.

ठळक मुद्देउल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहेगावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत.

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कल्याणपासून अगदी जवळ असलेल्या पठारपाडा ही आदिवासी लोकवस्ती स्वातंत्र्योत्तर काळात अद्यापही विविध सोयी सुविधांसह सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. याकडे सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकायांचे लक्ष वेधले आहेत. त्यांच्या अपेक्षित व सकारात्मक निर्णयाकडे उपेक्षित आदिवासींचे लक्ष लागून आहे.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. या पठाराच्या भूखंडावर उल्हासनगरची झोपडपट्टी व म्हारळगाव लगतच्या दगडखाणींनी पोखरला आहे. पठारावरील माळरानावर असलेल्या या गावातील आदिवासींचा खाणीच्या स्फोटातील दगडापासून बचावल्यामुळे रोजच पुनर्जन्म अनुभवायला मिळत आहे. पर्यावरणाचा -हास होतो... याचा विचार करण्या आधी रहिवाशी मरण यातना भागताहेत त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची अपेक्षा श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी  भेट देऊस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना आॅनलाइन साकडे घातले आहे.सुमारे तीन वर्षापूर्वी लोकमतने देखील याकडे म्हारळगाव प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांच्या पाण्याची समस्या दूर केली होती. गाव तेथे रस्ता म्हणणाऱ्यां प्रशासनाकडून या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची सुविधा केलेले नाही. या गावात जाण्यासाठी दोन्ही बाजुनी असलेल्या दगडखाणीच्या कडेकडेने पाऊल वाटेव्दारे या गावाकडे जाणे शक्य होते. अतिशय खडतर व निर्मणुष्य डोंगर टेकड्यातून या आदिवासी गावात जावे लागते. महापालिकां दोन नगार परिषदांच्याजवळ असलेल्या या गावपाड्यातील दयनीय अवस्था अतिशय दु:ख व वेधनादायक धक्के देणारी आहे.गावात जायला पक्का गाडीरस्ता रस्ता नाही . गंभीर आजारी व्यक्ती, गरोदर महिला, सर्पदंशाचे बळींना या युगातही झोळीत टाकून रूग्णालयात उपचारा करीता न्यावे लागत आहे. यामुळे बरेचदा बाळंतपण घरीच होते. प्रसंगी उपचारा अभावी रु ग्ण दगावल्याचे धक्कादायक अनुभव येथील गावकऱ्यांकडून सांगितले जात आहेत. गावाच्या दोन दिशांना दगड खाणी आहेत. रोज संध्याकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान दगडखणीतील स्फोटांमुळे वस्ती हादरते, घरांना भेगा पडताहेत. लहान बालके भेदरतात. वस्तीमध्ये खाणीतील दगड पडतात. गावात ४ थीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर मुलांना याच धोकादायक पायरस्त्याने गोवेली,कंबा येथे शाळेत जावे लागते. संध्याकाळच्या स्फोटात रस्त्यावरही दगड येतात. त्यामुळे कित्येक मुले घाबरून शाळेत जात नाहीत.गावात सहा वयोगटापर्यंतचे सुमारे २२ बालके आहेत. पण अंगणवाडी नसल्यामुळे पूरक आहारापासून बालके वंचित आहेत. बालकांचे वजने घेतली जात नाहीत. या गावाला भेट दिली असता तुळपुळे यांनी किमान पाच बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळून आले आहेत. सुमारे पाच ते सहा पिढ्यापासून असलेल्या या गावाला गावठाण नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ७ / १२ च्या उताऱ्यांवरून ही वस्ती सरकारी जागेवर असल्याचे दिसून येत आहे . गावास लागून असलेल्या जमिनीवर आदिवासी कुटुंबे शेती करीत आहेत. त्यांनी पीकपहाणीसाठी वेळोवेळी अर्जही केलेले आहेत. पण नोंदी केलेल्या नाहीत. आदी विविध तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून त्यांची दलख घेण्यासाठी पाटपुरावा केला जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcollectorतहसीलदार