ठाणे : मुंबईतील पी. स्क्वेअर इंटरनॅशनल अकादमीने घेतलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस आणि वैदिक मॅथ स्पर्धेत नवी मुंबईच्या ऐरोली येथील दत्ता मेघे वर्ल्ड अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या इयत्ता आठवीतील मोहित जाधवने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन चषकावर आपले नाव कोरून हॅट्ट्रिक साधली आहे. मोहितने २०१४ आणि २०१५ मध्ये अॅबॅकस, तर २०१६ साली वैदिक मॅथ स्पर्धेत चॅम्पियन चषक पटकावून ही हॅट्ट्रिक केली आहे. शाळेतील इतर घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वेदान्ती साखरे (फर्स्ट रनर अप), श्रेयस सुब्रह्मण्यम (सेकंड रनर अप), अदिती टामटा (मेरीट) आणि प्रायमरी गटात मोहम्मद गुलाम (चॅम्पियन) यांनी वैदिक मॅथमध्ये यश मिळवले आहे. तर, अॅबॅकसमध्ये नवामे (चॅम्पियन), अनुष्का टामटा (फर्स्ट रनर अप), प्रणीत कांबळे आणि यशोधन (सेकंड रनर अप) आणि कनिष्क पाटोळे (मेरीट) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी. स्कवेअर इंटरनॅशनल अकादमीचे संचालक प्रसाद शृंगारपुरे आणि पूजा शृंगारपुरे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना दत्ता मेघे वर्ल्ड अकादमी शाळेचे अॅबॅकस आणि वैदिक मॅथचे शिक्षक नैमेश देसाई यांच्यासह मुख्याध्यापक संदीप सिंग, को-आॅर्डिनेटर कवलजित कौर आणि सुखदीप कौर दत्ता यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
मोहित जाधवची अनोखी हॅटट्रिक
By admin | Updated: December 23, 2016 02:44 IST