शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

स्वत:च्या कार्यातून ‘त्या’ शिक्षिकेचे सावित्रीबाईंना अनोखे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:16 IST

महिला शिक्षण दिन विशेष

स्नेहा पावसकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घरात एक स्त्री शिक्षिका असली की, ती संपूर्ण घर कसे शिक्षित आणि सुसंस्कारित करते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भिवंडीच्या लामज येथे राहणाऱ्या आणि ठाणे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला सोनावणे. डीएड असूनही बेरोजगार असणाऱ्या आपल्या पतीला संसारापासून ते नोकरी मिळणे या सगळ्यात त्यांनी साथ दिली. तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. इतकेच नव्हे, या सावित्रीच्या दोन सुना शिक्षिका असून, एक डॉक्टर आहे, तर दोघींपैकी एका सुनेने लग्नानंतर ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचार व शैक्षणिक योगदानाचा अभ्यास’ हा विषय घेऊन संशोधन पूर्ण केले आहे. स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून घडलेल्या शकुंतला सोनावणे यांचे कार्यही आधुनिक काळातीच सावित्रींच्या लेकींसाठी प्रेरणादायी आहे.

शकुंतला सोनवणे या जुनी ११वी उत्तीर्ण. १९७२ साली सुभाष सोनावणे यांच्याशी लग्न झाले. सासरी गरिबी तर होतीच, पण डी.एड असूनही पती सुभाष बेरोजगार होते. शकुंतला स्वत:ही सुशिक्षित होत्या. मात्र, भविष्याचे काय, या विचाराने त्या सतत अस्वस्थ असायच्या. पती शेतीत रमले होते. मात्र, शकुंतला नोकरीसाठी शोधाशोध करायच्या.

त्याच वेळी गावात कोणीतरी आणलेल्या वर्तमानपत्रात ठाणे जिल्ह्यात शिक्षक भरती असल्याचे समजले आणि त्या बातमीने पुढे सुरू झाला शकुंतला यांचा सावित्रीच्या कार्याला सार्थ ठरावा असा प्रवास. पती सुभाष यांना ७५ साली भिवंडीत शिक्षकाची नोकरी मिळाली, पण स्वत:लाही नोकरीसाठी त्यांची धडपड सुरू होती. आग्रहाने पत्रद्वारा प्रशिक्षण योजना या शासनाच्या शिक्षण व्यवस्थेमार्फत शकुंतला यांनी परेल येथील शिरोडकर अध्यापक महाविद्यालयात आपले दोन वर्षांचे डी.एड प्रशिक्षण पूर्ण केले. वाहतुकीच्या मर्यादित सुविधा असूनही लामज ते परेल असा कष्टप्रद प्रवास करत, त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि मग त्यांना नोकरी मिळाली. घरात तीनही मुलांना त्यांनी उच्चशिक्षित केले. जशी मुले तशाच तीनही सुना उच्चशिक्षित असाव्यात, असा त्यांचा मनोदय होता.