शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी रंगला अनोखा फ्रीडम फ्लॅश मॉब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:53 IST

फ्रीडम फ्लॅश मॉब’ आणि मुलांच्या नृत्याविष्काराला टाळ्यांची दाद देत उपस्थित मान्यवरांसह ठाणेकरांनी या फ्लॅशमॉबवर धरलेला ठेका, असे स्वातंत्र्य दिनाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले

ठाणे : मान्यवरांच्या हस्ते झालेले झेंडावंदन, त्यानंतर पालकांसह जमलेली हजारो मुले, हिंदी-मराठी देशभक्तीपर गीते सुरू होताच या मुलांनी एकत्र येत जोशपूर्ण वातावरणात सादर केलेला ‘ फ्रीडम फ्लॅश मॉब’ आणि मुलांच्या नृत्याविष्काराला टाळ्यांची दाद देत उपस्थित मान्यवरांसह ठाणेकरांनी या फ्लॅशमॉबवर धरलेला ठेका, असे स्वातंत्र्य दिनाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते मंगळवारी कोरम मॉलमध्ये. लोकमतच्या पुढाकाराने, टॅन्ट्रम डान्स अकॅडमीच्या वतीने आणि कोरमच्या सहकार्याने हा आगळावेगळा फ्लॅश मॉब आयोजिण्यात आला होता.या सोहळ्याला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे सहायक सरव्यवस्थापक राघवेंद्र शेट, लोकमत ठाणेचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, मिस वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडेल २०१७ शेरील चार्ल्स, कोरम मॉलचे संतोष नायर, शंतनू जोशी, मिस अ‍ॅण्ड मिसेस टिआरा इंडियन आॅर्गनायझेशनच्या संस्थापक रेखा मिरजकर, क्रिएटिव्ह डायरेक्टर ऋषीकेश मिरजकर, टॅन्ट्रम डान्स अकॅडमीचे संस्थापक चंद्रकांत रायकर उपस्थित होते.या वेळी शेरील चार्ल्स यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर बघताबघता कोरम मॉलच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी एकत्र जमले आणि क्षणार्धातच सब से आगे होंगे हिंदुस्थानी, रंग दे बसंती, कंधो से मिलते है कंधे, जय हो... अशा देशभक्तीपर गीतांवर त्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्काराच्या माध्यमातून फ्लॅश मॉब सादर केला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या फ्लॅश मॉबमध्ये शेरील चार्ल्स यांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत नृत्य केले. तसेच मुलांसोबत त्यांनी सेल्फीही काढला. या मॉबमध्ये न्यू इंग्लिश स्कूल- कळवा, पद्मावती व्यंकटेश हायस्कूल- कळवा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्लिश हायस्कूल- कोपरी, ज्ञानप्रसारणी स्कूल- कळवा, मिलाग्रीस इंग्लिश स्कूल-कळवा अशा पाच शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांबरोबर ज्येष्ठांनीही उपक्रमाचा आनंद लुटला. ध्वजारोहणाबरोबरच फ्लॅश मॉबचा हा उपक्रम अतिशय सुंदर आणि हटके ठरला, असे मत रेखा मिरजकर यांनी व्यक्त केले.>स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता. देशप्रेम या थीमवर आधारित कोरम मॉलमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम साजरा झाला आणि अशा उपक्रमांसाठी कोरम मॉल कायम लोकमतच्या सोबत असतो.- संतोष नायर,सेंटर हेड कोरम मॉल>फ्लॅश मॉबसारख्या अनोख्या कार्यक्रमातून लोकमतने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला आणि या ध्वजारोहणाचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य आहे.- शेरील चार्ल्स,मिस वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडेल>नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षाही हा वेगळा कार्यक्रम होता. ज्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचता आले. या फ्लॅश मॉबमध्ये मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. विविध देशभक्तीपर गीतांवर मुलांनी उत्तम नृत्य सादर केले. मुलांच्या सहभागानेच या कार्यक्रमाला अधिक रंगत आली.- चंद्रकात रायकर, टॅन्ट्रमचे सर्वेसर्वा