शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय ग्रामविकास मंत्री २५ आॅगस्टला शहापूरच्या दुर्गम भागातील विहिगांवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 20:03 IST

सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता हे गाव जगाच्या संपर्कात आले आहे.

ठळक मुद्देखासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले या गावास केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमरराज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील २५ आॅगस्टला भेट देणार नॉटरिचेबल गावास रिचेबल, आता हे गाव जगाच्या संपर्कात एक हजार ८५० लोकवस्ती

ठाणे : सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले आहे. एक हजार ८५० लोकवस्तीच्या या गावास केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर, तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील २५ आॅगस्टला भेट देणार आहेत. तत्पूर्वी या गावातील सोयीसुविधांसह विविध स्वरूपांच्या विकासकामांचा आढावा सहस्रबुद्धे यांनी जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी घेतला.        सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता हे गाव जगाच्या संपर्कात आले आहे. याप्रमाणेच या गावाच्या ग्रामविकास आराखड्यात मंजूर असलेल्या ६८ कामांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासमवेत त्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सादरीकरण करून क्षेत्रनिहाय विविध कामांच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. प्रस्तावित आराखड्यातील सुमारे ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे २० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.      गावातील विकासकामांच्या समारोपाचा कार्यक्रम येत्या २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर तसेच शहापूरचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

एक हजार ८५० लोकवस्तीच्या या गावास

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी