शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले...

By admin | Updated: July 29, 2016 02:43 IST

आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत

- राजेश जाधव,  कल्याणआधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत असलेले रवींद्र गायकवाड यांचे कुटुंब बेघर झाले आहे. दुर्घटनेनंतर आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी लंबीचौडी आश्वासने दिली. आता कुणीही दखल घेत नसल्याने गायकवाड यांची अवस्था ‘लोक भेटायास आले काढत्या पायांसवे, अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले’, अशी झाली आहे.गायकवाड सांगतात की, तीन दिवस आजूबाजूच्या लोकांनी आसरा दिला. मात्र, आता त्यांनी हात वर केले. पत्नी सुजाता, वयोवृद्ध आई, लग्नाची मुलगी रोहिणी आणि राकेश व रितेश ही दोन मुले यांना घेऊन कुठं जाऊ, कुठं राहू, असा प्रश्न पडला आहे. स्फोटानंतर बांधकाम पाडून साफ केलेल्या मोकळ्या जमिनीच्या तुकड्याकडे गायकवाड दिवसभर पाहत बसलेले असतात. गायकवाड यांच्यासारखीच स्थिती शेजारील आवारे व धनगर कुटुंबांची झाली आहे.गायकवाड गेला महिनाभर आजारी आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता सिलिंडर स्फोटानंतर मुलगी जोरजोरात ओरडू लागली की, बाबा आपलं घर कोसळतंय. आयुष्यभराची कमाई खर्च करून बांधलेलं घर पडतंय, या कल्पनेनं पायाखालची जमीन सरकली. घराच्या खचलेल्या भिंती पाहून मनानं खचलो होतो. तेवढ्यात, शेजारच्या घरातील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या किंकाळ््या ऐकून त्यांना वाचवायला धावलो. महापौर राजेंद्र देवळेकर भेटायला आले तेव्हा मी त्यांना माझी व्यथा सांगितली. ते म्हणाले की, काही काळजी करू नकोस. मात्र, अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही की, आसरा घेण्याची पर्यायी व्यवस्था झाली नाही. आमच्या अंगावर धड कपडे नाहीत. आई नेसलेल्या लुगड्यानिशी तीन दिवस वावरत आहे. मुलीला कुणीतरी ड्रेस बदलायला दिला. मला शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शाल पांघरायला दिली. गेले तीन दिवस तीच अंगाभोवती गुंडाळून फिरतोय, असं गायकवाड यांनी सांगितलं. गायकवाड यांची पत्नी सुजाता म्हणाल्या की, स्थानिक आमदार, नगरसेवक कुणीही आमची विचारपूस करायला फिरकले नाहीत. श्रीमंतांचा एखादा टॉवर कोसळला असता तर त्यांचे अश्रू पुसायला हे सारे धावत आले असते. दोन वेळा काय खायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुले शिक्षण घेताहेत, मुलीचं लग्न करायचंय, असा प्रश्न आहे. पण मदतीसाठी कोणाचेही हात आमच्याकडे आलेले नाहीत.