शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भुयारी गटारे झाली ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:26 IST

सर्वत्र दुर्गंधी : रस्त्यावरून वाहत आहे सांडपाणी

n  सदानंद नाईक     लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील भुयारी गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. तुंबलेल्या भुयारी गटारांच्या दुरुस्तीचे काम खाजगी ठेकेदाराकडून होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप सोनावणे यांनी दिली.उल्हासनगरात भुयारी गटार योजनेची क्षमता संपल्याने ती ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या गटारांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने खाजगी ठेकेदार नेमला असून दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, गटारे ओव्हरफ्लो होण्याचे थांबत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने भुयारी गटार योजना महापालिकेने सुरू केली असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मुख्य गटारांचे पाइप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर, वडोलगाव व शांतीनगर येथील मलशुद्धीकरण केंद्राचे कामही ९० टक्के झाले असून खडेगोळवली येथील मलशुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती सोनावणे यांनी दिली आहे.

शहरातील गुरुनानक शाळा, कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी, दहाचाळ, संभाजी चौक, मराठा सेक्शन, सत्य साई शाळा, मुख्य रस्त्यासह शहरातील बहुतांश ठिकाणी भुयारी गटारे ओव्हरफ्लो होत असून गटारे साफ करण्याची गाडीही वेळेवर मिळत नसल्याने, सांडपाणी रस्त्यावर वाहते. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत गटारांचे पाइप बदलण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. कोरोना कालावधीत या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम ठप्प पडले असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी व्यक्त केली. पालिकेच्या भाेंगळ कारभारावर  नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यातभुयारी गटारांची क्षमता केव्हाच संपली असून शहारांतर्गत भुयारी गटारांचे पाइप बदलण्याची गरज आहे. हे पाइप वेळेत बदलले नाही तर शहरात गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहून रोगराई पसरण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया सभागृहनेते भरत गंगोत्री यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर