शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजना निष्प्रभ ठरल्याचे उघड

By admin | Updated: June 27, 2017 02:58 IST

पालिकेकडून मोठे व लहान पक्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या. उंच केलेले रस्ते पाणी साचण्याचे कारणीभूत ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : पालिकेकडून मोठे व लहान पक्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या. उंच केलेले रस्ते पाणी साचण्याचे कारणीभूत ठरले. तर कोट्यवधी रूपये खर्चाची भूमिगत गटार योजनाही निष्प्रभ ठरल्याचे समोर आले. काँक्रीटचे पक्के लहान मोठे नाले बांधले पण त्याची सफाईच झाली नाही. जागोजागी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आदी कचरा अडकल्याने ते काढायचे काम नागरिकच करत होते. दुपारच्या भरती मुळे नवघर गाव, इंदिरानगर, शिवशक्तीनगर आदी खाडी जवळील भागात भरतीचे पाणी आले. आयुक्त नरेश गीते यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यासह खाडीची पाहणी केली. उपमहापौर प्रवीण पाटील, नगरसेविका संध्या पाटील, वंदना विकास पाटील आदींसह नागरिक जमले होते. येथे झालेल्या झोपड्या व भराव हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिवाय चाळघर, शंकर नारायण महाविद्यालय नाला व इंदिरा नगर खाडी येथे उघाडी करुन दरवाजे बसवण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली. मीरा रोडच्या नयानगर, शांतीनगर, शांतीपार्क, विजय पार्क, आरएनए आदी सखल भागातील वसाहतीं मध्ये पाणी शिरले होते. काशिमीऱ्याच्या संजय गांधी उद्यानाच्या डोंगर पट्यातून पावसाचा मोठा लोंढा आल्याने काशिमीरा, लक्ष्मीबाग, मुन्शी कंपाऊंड, अमिषा पार्क आदी परिसर पाण्याखाली गेला होता.