शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खांदा कॉलनीत अनधिकृत झोपडपट्टी

By admin | Updated: July 13, 2015 23:18 IST

एकीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी सिडको पुढे सरसावली असून दररोज यासाठी योजना आखली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी वाढणाऱ्या बेकायदा झोपडपट्ट्यांवर

वैभव गायकर, पनवेलएकीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी सिडको पुढे सरसावली असून दररोज यासाठी योजना आखली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी वाढणाऱ्या बेकायदा झोपडपट्ट्यांवर सिडकोचे दुर्लक्ष होत असून खांदा कॉलनी सेक्टर १२ मध्ये सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर काही दिवसातच शेकडो झोपड्या उभ्या राहिल्या आहेत.रेल्वे रुळानजीक असलेल्या या परिसरात काही दिवसांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या झोपड्या उभ्या होत्या. मात्र सध्या याठिकाणी अनधिकृत झोपड्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही अधिकारी देखील या अनधिकृत झोपडपट्टी वसविण्यामागे असल्याचा आरोप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याठिकाणी परप्रांतीय नागरिक देखील मोठ्या संख्येने राहत आहेत. एक झोपडी बांधण्यासाठी ५० हजारांपासून लाखो रुपये मोजावे लागत असल्याचे एका झोपडपट्टीधारकाने सांगितले. सध्या याठिकाणी १५० झोपड्या असून यावर लगाम घातला नाही तर ही संख्या काही दिवसातच हजारोवर जाईल.येथे राहणाऱ्या शांताराम गायकवाड यांनी सांगितले की, आमच्याकडे पँनकार्ड, आधार कार्ड, पूरग्रस्त आदीचे पुरावे आहेत तसेच आम्ही काही दिवसांपूर्वीच मतदार याद्यांमध्ये नावनोंदणीसाठी पुरावे सादर केले आहेत. मात्र आम्हाला ती मिळाली नाहीत. याठिकाणी राहत असलेले रहिवासी हे मजूर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे परराज्यातून आलेले मजूर याठिकाणी वास्तव्यास आहेत. मूळचे बिहारचे रहिवासी असलेले नंदकिशोर साहनी आपल्या सहा जणांच्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहे. याठिकाणी झोपडी बांधायची परवानगी तुम्हाला कोणी दिली असे विचारले असता साहनीने काहीही बोलण्यास नकार दिला.रेल्वे रुळानजीक वसविलेल्या अनधिकृत झोपडपट्टीमुळे येथे गंभीर अपघाताची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारी लहान मुले खेळता खेळता रेल्वे रु ळावर जातात यावेळी गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील प्रश्न उपस्थित होत आहे. झोपडपट्टी वसविण्यामागे मतांचे राजकारण असल्याची चर्चा याठिकाणी आहे. यामागे काही अधिकारी असल्याचे देखील बोलले जात आहे. खांदा कॉलनीमधील अनधिकृत झोपडपट्टीसंदर्भात सिडकोचे बांधकाम नियंत्रक विभागाचे अधिकारी एस.जे. गोसावी यांच्याशी संपर्कसाधला असता पावसाळ्यानंतर त्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रि या दिली.