शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या नाकाखाली अनधिकृत जॅमर, वाहनचालकांच्या युक्तीमुळे बुडतोय महसूल, वाढतेय बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:47 IST

रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून काही बहाद्दरांनी ठाणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्वत:चेच जामर लावून आपले इप्सीत साधण्याची भन्नाट शक्कल लढविली आहे.

ठाणे : रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून काही बहाद्दरांनी ठाणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्वत:चेच जामर लावून आपले इप्सीत साधण्याची भन्नाट शक्कल लढविली आहे. वाटेल तिथे वाहने उभी करताना हे बहाद्दर स्वत:च जॅमर लावून ते वाहतूक शाखेचे असे भासवित आहे. वाहतूक अशा वाहनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाचा महसूल मात्र बुडत आहे. एवढेच नव्हे तर चोरांकडूनही अशा वाहनांचे एक प्रकारे रक्षण होत आहे.ठाण्यात पार्किंगची मोठी समस्या आहे. जागाच उपलब्ध नसल्याने रस्त्याच्याकडेलाच वाहने उभी केली जात आहेत. यामुळे कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांची सतत धडक कारवाई सुरू असते. टोर्इंग व्हॅन शहरात फिरवून ते मोटरसायकलसारख्या लहान गाड्या टोर्इंग करून नेतात. परंतु, टोर्इंग व्हॅनवर जागेचा अभाव असल्याने रस्त्यालगत अनधिकृत पार्क केलेल्या चारचाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना ते आहे त्याच जागेवर जॅमर लावून त्यांच्या मालकांकडून दंड वसूल करतात. एका गाडीसाठी १०० रु पये आणि त्यानंतर प्रत्येक तासाला ५० रु पयांचा दंड आकाराला जातो. शिवाय कागदपत्रे नसल्यानेही तो भरावा लागतो. त्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाºया चारचाकी गाडी चालकांना मोठा भुर्दंड असून त्यांचा वेळही वाया जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून अशा अनधिकृत पार्किंगवर काही चालकांनी चांगलाच उतारा शोधून काढला आहे. तो म्हणजे स्वत:ची गाडी हवी तिथे उभी करायची, तिला घरून सोबत आणलेले जॅमर लावायचे अन आपली कामे उरकायची. पोलिसांची टोर्इंग व्हॅन अशा वाहनाजवळ आली तर गाडीचा जॅमर पोलिसांचा आहे की अन्य कुणाचा याची खातरजमा न करताच ते त्याकडे दुर्लक्ष करून पुढे मार्गस्थ होतात. एवढेच नाहीतर अशी पार्क केलेली गाडी रात्रभरही त्याच जागेवर बेवारस म्हणून राहिली तरी तिच्या चाकाला लावलेले जॅमर बघून पोलिसांसह चोरांकडूनही तिला अभय मिळते. शहरात रस्त्याच्या कडेला,सोसायट्यांच्या आवाराबाहेर अशा जॅमर लावलेल्या गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.बाजारात दीड हजारात मिळतो जॅमरयाबाबत वाहतूक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. नौपाडा येथील अत्रे कट्टयासमोरही अशाच प्रकारचा जॅमर लावलेली मारु ती व्हॅन गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे उभी केलेली आहे. विशेष म्हणजे ती व्हॅन दुसºया दिवशीही जवळच दुसºया ठिकाणी लावल्याचे दिसून आले. वाहतूक शाखेकडून गाड्यांना जॅमर लावताना तो चालकाला दिसावा म्हणून तो पुढच्या चाकालाच लावला जातो.परंतु, या व्हॅनला मागील चाकाला लावण्यात आला होता.अशी चुक पोलीस कधीच करीत नाहीत,असे एका अधिकाºयाने सांगितले. शिवाय असे जॅमर बाजारात १२०० ते १५०० रु पयांना मिळतात. त्यामुळे काही चालक कारवाई टाळण्यासाठी स्वत:च असे जॅमर लावतात. हे ही त्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर कबूल केले.