शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनधिकृत गोडाउन रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:59 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी परिसरात अनधिकृत गोडाऊनचे मोठे जाळे आहे.

सुरेश लोखंडे

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी परिसरात अनधिकृत गोडाऊनचे मोठे जाळे आहे. या गोडाऊनमध्ये विनापरवानगा जीवघेण्या रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे या गोदामांवर कारवाई करण्याचे सुतोवाच गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सोमवारी केले. या कारवाईची विधान परिषदेत घोषणा होताच जिल्ह्यातील ठिकठिकाणी सरकारी जमिनीवरील व कांदळवन नष्ट करून अनधिकृत गोडाऊन बांधणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहे.आगीस कारणीभूत ठरणारे ‘रासायनिक स्फोट सर्वाधिक’... आठ महिन्यात ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू’ या मथळ्याखाली १५ मार्च रोजी वृत्तप्रसिद्ध करून लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यास अनुसरून विधान परिषदेत चर्चा होऊन भिवंडीतील विस्फोटकांचा साठा करणाºया गोदामांवर कारवाई करण्याचे पाटील यांनी सूचित केले. यामुळे जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील गोडाऊन जिल्हा प्रशासनासह पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कोणत्याही क्षणी त्यावर कारवाई होऊन ते भुईसपाट होण्याच्या भीतीने गोडाऊन मालक हादरले.भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गा लगतच्या गावांजवळ ही अनधिकृत गोडाऊन आहेत. कांदळवन नष्ट करून उभ्या असलेल्या गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. यातील १९३ गोडाऊन मध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा बिनदिक्कत होत आहे. यातील केवळ चार गोडाऊन मालकांकडे परवाना आहेत. उर्वरित १८९ गोडाऊनमध्ये जीवघेण्या विस्फोटकांचा साठा होत असल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. पण या पेक्षा अन्यही ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय असल्यामुळे प्रशासन त्यादृष्टीने कारवाईच्या प्रयत्नात आहे.घातपातास कारणीभूत असलेल्या या रासायनिक विस्फोटकांचा गोडाऊनमध्ये या आधी स्फोट झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामुळेच या अनधिकृत गोडाऊनमध्ये जीवघेण्या आगीच्या दृर्घना घडून मृत्यूही होत आहेत. रासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत.