शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बाबांच्या त्यागाची तुलना अशक्य- सिने दिग्दर्शक विजू माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 09:39 IST

शारदा प्रकाशाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन ऑनलाइन पार पडले.

ठळक मुद्देप्रज्ञा पंडित यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ऑनलाइन संपन्नबाबांच्या त्यागाची तुलना होऊ शकत नाही : विजू मानेशारदा प्रकाशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आयोजित सोहळा संपन्न

ठाणे : "आईच्या त्यागाची महती नेहमीच गायली जाते. पण बाबांच्या त्यागाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही . कणखर पण पहाडी प्रेम करणारे बाबा अख्खे घर खांद्यावर घेऊन लढत असतात "असे भावनोदगार प्रसिद्ध सिने दिग्दर्शक,  लेखक विजू माने यांनी काढले. शारदा प्रकाशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांच्या  ' बाबा (संपादित काव्यसंग्रह) , प्रज्ञाक्षरे , काव्यलिपी या पुस्तकांच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सीताराम राणे उपस्थित होते .

          यावेळी सर्व सहभागी कवींचे कौतुक करताना विजू माने म्हणाले" 'बाबा' हा विषय अतिशय हृदयस्पर्शी आहे. आईबद्दल नेहमीच लिहिले-बोलले जाते पण बाबांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पाठवलेल्या कवितांमधून निवडक कविता घेत कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी अतिशय कल्पकतेने 'बाबा ' या विषयावरील महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कवितांचे यशस्वी संपादन केले आहे. व्यक्त होणे यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद या कठीण प्रसंगी या कवींनी दिला आहे. समाजावरील दुःखाचे मळभ घालवायचे असेल तर काव्याक्षरे अधिक प्रमाणात व्यक्त झाली पाहिजेत."

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिष पंडित यांनी उपस्थितांचे कल्पकतेने स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते तिन्ही पुस्तकांचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.            " ज्याच्या अमर्याद मेहनतीच्या जोरावर आपले आयुष्य उभे राहते ते म्हणजे आपले बाबा " अशी काव्यमय सुरुवात करून कवयित्री प्रज्ञा पंडित आपल्या  मनोगतात म्हणाल्या ", जगण्याची जिद्द आणि उमेद ज्यांच्यामुळे वाढते त्या आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान असते. देव्हाऱ्यात देव असतो आणि आपल्या प्रगतीच्या ,यशाच्या वाटेवर आपले 'बाबा ' असतात. म्हणूनच या अनेक कवींच्या कवितांतून संघर्षाला साद घालणारे कणखर बाबा आपल्याला भेटतात. शब्दबद्ध होतात. जगणे समृद्ध करणाऱ्या या साहित्यिक प्रवासात एकाचवेळी तीन पुस्तके प्रकाशित होणे हे  माझ्या बाबांचेच देणे आहे असे मी मानते."           "बाबा , का केवळ शब्द नसून आयुष्य भारून  टाकणारा मंत्र असल्याचे सांगून ठाणे डिस्ट्रिक्ट को - ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष  सीताराम राणे म्हणाले," आजपर्यंत आईचे जितके कौतुक झाले त्यामानाने बाबा दुर्लक्षितच राहिले. आईचे महत्व कोणीही नाकारणार नाही ,पण घराचा आधारस्तंभ म्हणून मेढीचे लाकूड होणाऱ्या बाबांना या काव्यसंग्रहातून कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी न्याय दिला आहे. त्यांनी अनेक कवींना लिहिते केले आहे .या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता आहेत. कवयित्री प्रज्ञा पंडित या काव्यसंग्रहाचा दुसरा भागही प्रकाशित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला." महाराष्ट्रातील सर्व कवींच्यावतीने कवी प्रसाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याचे शैलीदार सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन मनिष पंडित यांनी केले. या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील  दोनशेहून अधिक कवी- लेखक सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य