शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची कोंडी; नगरसेवकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:57 IST

दुसरीकडे नगरसेवक भोईर आणि सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंग ग्राउंडविरोधी कृती समितीनेही प्रकल्पास विरोध केला आहे. यापूर्वी जेव्हा विरोध झाला,

मुरलीधर भवार कल्याण : घनकचरा प्रकल्पांमुळे केडीएमसी अडचणीत आली आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेशिवाय आधारवाडी डम्पिंग कायमस्वरूपी बंद होऊ शकत नाही. उंबर्डे कचरा प्रकल्पाचे काम सुरू होऊनही महापालिकेने कंत्राटदार कंपनीला ८० लाखांचे बिल अद्याप दिलेले नाही. तर, दुसरीकडे प्रकल्पाच्या कामास स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी पुन्हा विरोध केल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे.

महापालिका कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. प्रकल्प राबवण्यास चालढकल केल्याप्रकरणी महापालिका हद्दीत २०१५ मध्ये नव्या इमारतींच्या बांधकाम मंजुरीवर न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर, २०१६ मध्ये महापालिकेने कचरा प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या, जागेचा प्रश्न, निविदा काढणे, या प्रक्रियेत वेळ वाया गेला आहे.

महापालिकेने उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. सौराष्ट्र कंपनीला प्रकल्प राबवण्याचे कंत्राट दिलेले आहे. उंबर्डेतील घनकचरा प्रकल्पाचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. मात्र, महापालिकेने कंत्राटदारास बिल दिलेले नाही. त्यामुळे पुढील काम कसे करायचे, असा प्रश्न कंपनीसमोर आहे.

दुसरीकडे नगरसेवक भोईर आणि सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंग ग्राउंडविरोधी कृती समितीनेही प्रकल्पास विरोध केला आहे. यापूर्वी जेव्हा विरोध झाला, तेव्हा महापालिकेने पोलीस बंदोबस्तात बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू केले होते. आता घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. भोईर म्हणाले की, उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाबरोबरच बारावे व मांडा येथेही कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे. सध्या उंबर्डे येथेच प्रकल्पाचे काम सुरू आहे. अन्य ठिकाणीही प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तेथील काम सुरू झाल्यावर उंबर्डे येथील काम सुरू करावे. दरम्यान, या आशयाचे पत्रही कृती समितीनेही आयुक्तांना दिले आहे.

बारावेप्रकरणी १० जूनला सुनावणीबारावे घनकचरा प्रकल्पास बारावे हिल रोड सामाजिक संस्थेने विरोध केला आहे. या ठिकाणच्या एका जागरूक नागरिकाने हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. लवादाने हे प्रकरण राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे वर्ग केल्यावर सरकारने याप्रकरणी देवधर समिती नेमली. या समितीने यापूर्वी पाहणी केली आहे. समितीच्या अहवालप्रकरणी १० जूनला सुनावणी होणार आहे.

जनसुनावणीचा अहवाल तज्ज्ञ समितीसमोरमांडा येथे घनकचरा प्रकल्प करण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेतली होती. त्यावेळी नागरिकांनी प्रकल्पास तीव्र विरोध केला होता. जनसुनावणीचा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर ठेवला आहे. समितीसमोर तो विचाराधीन आहे.