शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरची दारूबंदी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:30 IST

उल्हासनगरात दारूबंदी करावी, असा प्रस्ताव सभागृहनेते जमनु पुरस्वानी यांनी मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. पण चर्चेअंती त्यांनी त्तो मागे घेतला.

- लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : उल्हासनगरात दारूबंदी करावी, असा प्रस्ताव सभागृहनेते जमनु पुरस्वानी यांनी मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. पण चर्चेअंती त्यांनी त्तो मागे घेतला. या प्रस्तावामुळे दारू विक्रेते भाजपावर नाराज झाले होते. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीतूनच प्रस्ताव मागे घेण्यात आला अशी टीका विरोधी आणि भाजपा सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली. दरम्यान, दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणांनी सभागृह मात्र दणाणून गेले. रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, भारिपच्या कविता बागूल, पीआरपीचे प्रमोद टाले, भाजपा नगरसेविका रेखा ठाकूर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दारूबंदी झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. पुरस्वानी, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, भाजपाचे राजेश वधारिया, साई पक्षाचे टोणी सिरवानी यांनी दारूबंदीसाठी विशेष महासभेची मागणी महापौर मीना आयलानी यांच्याकडे केली होती. त्यानुसार ती झाली. दारूबंदीचा विषय येताच पुरस्वानी यांनी प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले. प्रस्ताव मागे घेऊ नका, अशी मागणी भालेराव यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी केली. त्यावरून एकच गोंधळ झाला. आधीच ५०० मीटर अंतराच्या नियमामुळे दारू विक्रेते हैराण झाले आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झिजवणे सुरू केले. त्यातच दारूबंदीच्या प्रस्तावामुळे व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला होता. मात्र प्रस्ताव मागे घेतल्याने दारूमुळे उद्धस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आंदोलनाचा इशारा भालेराव यांच्यासह इतर पक्षांच्या नगरसेवकांनी दिला.