शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

By admin | Updated: April 12, 2017 03:42 IST

उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. उरलेल्या शहराला सध्या एक दिवसाआड पाणी मिळते आहे. एप्रिल महिना सुरू होताच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील किमान दोन महिने उल्हासनगरच्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीत काढावे लागतील, याची चुणूक यातून मिळाली आहे.सध्या उल्हासनगरची पाणीचोरी आणि गळती ४० टक्क्यांवर गेली आहे. या टंचाईविरोधात शिवसेनेने लगेचच उपोषणाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. एमआयडीसीकडून १२९ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी पालिकेला केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेच्या पहिल्या महासभेच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला. अनेकदा आवाज उठवूनही परिस्थिती सुधारत नसल्याने उपोषण करावे लागल्याचे नगरसेवक अरूण अशान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर : लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई असल्याची माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. शहरात ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबविल्यावरही पाणीटंचाई कायम आहे. टंचाई असलेले परिसर : कॅम्प नंबर चारच्या परिसरातील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाडा, सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की आदी परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे.प्यायला तरी पाणी द्या! : महापालिकेने राबवलेली ३०० कोटींची पाणी वितरण योजना पूर्णत: फसली आहे. नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी उपोषणाला बसलेले नगरसेवक अरूण अशान, शेखर यादव, सुनील सुर्वे, सोनु सान्पुर, माजी महापौर व नगरसेविका लीलाबाई आशान आदींनी केली आहे.