शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरची विशेष समिती ओमी टीमला की शिवसेनेला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:45 IST

अंतर्गत वादाचा फटका : २ मे च्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

उल्हासनगर : महापालिका सत्तेतील भाजप-ओमी टिम व साई पक्षातील वादाचा फटका विशेष समिती निवडणुकीलाही बसला आहे. या समिती सदस्यांची निवड २ मेच्या महासभेत होणार असून त्यात भाजपा शिवसेनेला मदत करते की ओमी टीमला एक समिती देऊन पक्षातील नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यावर सारे राजकीय चित्र अवलंबून आहे.उल्हासनगर महापालिकेवर सध्या भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. मात्रअंतर्गत वादामुळे गेल्या महासभेत पाणीटंचाईच्या लक्षवेधीवरून ओमी टीमच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रकरणावरून दोन्ही पक्षातील वाद जास्त ताणले गेले. गेल्या महासभेत १३ विशेष समिती सदस्य निवडण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र सत्ताधारी पक्षातील वाद बघता ऐन वेळी महापौर मीना आयलानी यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलला. आता २ मे रोजी महासभा बोलाविण्यात आली असून त्यात विशेष समिती सदस्यांची निवड होणार आहे.महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाकडे असून उपमहापौरपद साई पक्षाकडे आहे. चारपैकी दोन प्रभाग समिती सभापतीपदे साई पक्षाकडे, तर एक भाजपाकडे आहे. चौथे सभापतीपद शिवसेनेकडे गेले आहे. भाजपा आणि साई पक्षाने ओमी टीमला पदापासून बाजूला ठेवले असून सत्तेत समान वाटा मिळण्यासाठी नऊ ऐवजी १३ विशेष समित्याची स्थापना केली जाणार आहे. २ मेच्या महासभेत विशेष समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीपदाची निवड होणार आहे.आताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत विशेष समित्यांत भाजपा ओमी टीमच्या सदस्यांना स्थान देणार की शिवसेनेला खूष करणार हा प्रश्न भाजपापुढे आहे. विशेष समितीपासूनही ओमी टीमला भाजपाने बाजूला ठेवले तर उल्हासनगरातील सत्तांतर अटळ आहे. शिवसेनेला समितीत स्थान देऊन भाजपा नेते त्या पक्षाला सत्तेत वाटा देण्याची सुरूवात या निवडणुकीपासून करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.जिल्हा नियोजन समिती निवडणुकीवरही नजरमहापालिकेतील एकूण सदस्यसंख्या पाहता जिल्हा नियोजन समितीत तीन सदस्य निवडून जाऊ शकतात. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्योती गायकवाड; तर भाजपाकडून महेश सुखरामनी व ओमी टीमच्या पंचम कालानी यांनी अर्ज दाखल केले. ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाने ज्योती पिंटो भटिजा व गजानन शेळके यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने पंचम कलानी यांना पाठिंबा दिला नाही, तर त्यांचा पराभव निश्चित असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर