शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

उल्हासनगरचे रस्ते होणार नवरात्रोत्सवापूर्वी चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:29 IST

रस्तेदुरुस्तीला सुरुवात : दोन कोटींच्या निधीतून कामे

उल्हासनगर : महापालिकेने पावसाने विश्रांती घेताच रस्तादुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम सुरू केले. यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते चकाचक दिसतील, असे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले.उल्हासनगरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दोन महिन्यांमध्ये चार जणांचे बळी गेले. पावसाने विश्रांती घेताच महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरणे व दुरुस्तीचे काम सुरू केले. कॅम्प नं-१ मुरबाड रस्ता ते मच्छीमार्केट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू केले. प्रभाग समितीनिहाय मुख्य चार रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे भरण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून खाजगी कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात शिवसेनेने पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यापूर्वी भाजप, ओमी टीम आणि मनसेनेही आंदोलन केले. नवरात्रीपूर्वी शहरातील बहुतांश रस्ते चकाचक होतील, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. तसेच इतर रस्त्यांची दुरुस्तीही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.शहरातील डांबरीकरणाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरही डांबरीकरण करण्याची नामुश्की महापालिकेवर आली. नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, तहसील कार्यालय रस्ता, व्हीनस चौक ते लालचक्की रस्ता, मोर्यानगरी रस्ता, गुरुनानक शाळा रस्ता, खेमानी रस्ता, विठ्ठलवाडी ते पवई चौक रस्ता, शहाड ते उल्हासनगर बसस्टॉप रस्ता, गायकवाडपाडा रस्ता, हिराघाट रस्ता, गुलशननगर रस्ता आदी रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्तादुरुस्तीनंतर सहा महिन्यांत रस्ता उखडला अथवा रस्त्यात खड्डे पडले तर कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती करण्याची अट आहे. शहर अभियंता महेश शितलानी यांनी नवरात्री उत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरण्यात येतील, असे सांगितले.रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीची मागणीरस्त्यातील खड्ड्यांमुळे दोन महिन्यांत चार जणांचे बळी गेले आहेत. त्यांचे संसार उघड्यावर पडले. अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना पालिकेने मदतीचा हात देण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक शुभांगी बहेनवाल यांनी महासभेत करून लेखी निवेदन दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर