शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिका : भुयारी गटार योजना वादात? नगररचनाकार विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:00 IST

महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप

उल्हासनगर : महापालिकेच्या भुयार गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र योजनेला नगररचनाकार विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ती वादात सापडणार असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अरूण अशान यांनी केला. एकूण २२३ कोटींची योजना असल्याची माहिती पालिकेने दिली.उल्हासनगर महापालिकेने केंद्र व राज्य सरकारकडे भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र सरकारने २९० ऐवजी २२३ कोटीच्या योजनेला तीन टप्यात मंजुरी दिली. पहिल्या टप्याच्या ७१ कोटीच्या कामाला मंजुरी देत काम सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. सुरूवातीला पालिकेने सलग चार वेळा निविदा काढूनही कंत्राटदार मिळाला नाही. योजनेसाठी आलेला ३३ कोटीचा निधी परत जातो की काय? असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला होता. अखेर पालिकेला कंत्राटदार मिळून पहिल्या टप्प्याच्या कामाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली.महापालिका स्थायी समितीने मंगळवारच्या सभेत एकमताने मंजुरी दिली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक अशान यांनी योजनेच्या मंजुरीवर आक्षेप घेतला. शहराच्या नवीन विकास आराखडयानुसार नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसे प्रमाणपत्र न घेतल्याने ३०० कोटीच्या पाणी पुरवठा योजनेप्रमाणे भुयारी गटार योजना वादात सापडण्याची शक्यता आहे. योजना वादात सापडू नये म्हणून सरकारसह संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिका नियोजन समितीच्या सभापती ज्योस्त्ना जाधव यांनीही भुयारी गटार योजनेवर आक्षेप घेतला आहे.शहरातील भुयारी गटाराची क्षमता संपून ओव्हरफ्लो होत आहेत. तसेच मलशुध्दीकरण केंद्राकडे जाणारे बहुतांश सांडपाण्याचे पाईप २६ जुलैच्या महापुरात वाहून गेले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून थेट वालधुनी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात मलनिस:रण केंद्राकडे जाणाºया मुख्य सांडपाणी जलवाहिन्यांसह इतर मुख्य जलवाहिन्यांचे सांडपाणी एकत्र करून पम्पिंग स्टशेनद्वारे मलनिसारण केंद्रात सोडले जाणार आहे. तेथे प्रक्रिया करून पाणी खाडीत सोडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र्र निंबाळकर यांनी दिली. तसेच योजनेला नगररचनाकार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे की नाही, याची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर