शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे रविवारी लोकार्पण 

By सदानंद नाईक | Updated: March 9, 2024 20:21 IST

लोकसभा निवडणूका आचारसंहिता केंव्हाही लागणार असल्याने, अखेर लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांशिवाय उरकला.

उल्हासनगर: महापालिका परिवहन ई-बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी दुपारी शहाड बस डेपो येथे होणार आहे. लोकसभा निवडणूका आचारसंहिता केंव्हाही लागणार असल्याने, लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांशिवाय उरकला. 

उल्हासनगर परिवहन ई-बससेवा सज्ज असून बससेवा लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत होती. अखेर रविवारी दुपारी २ वाजता शहाड डेपो येथे महापालिका परिवहन ई-बस सेवा तसेच सिंधुभवन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गुरवारी महापालिका परिवहन बसच्या तिकिटाचे भाडे निश्चित करण्यात आले असून २ किमी अंतरापर्यंत वातानुकूलित बसची तिकीट १० रुपये तर ४ किमी पर्यंत १५ रुपये, ६ किमी पर्यंत १८ रुपये तर ८ किमी अंतरापर्यंत २५ रुपये राहणार आहेत. तर विना वातानुकूलित बसचे तिकीट दर २ किमी अंतरापर्यंत ५ रुपये, ४ किमी पर्यंत १० रुपये, ६ किमी पर्यंत १२ रुपये तर ८ किमी पर्यंत १८ रुपये असणार आहे. त्यांनतर प्रत्येक २ किमी अंतरावर २ ते ३ रुपये तिकिटाचे दर वाढणार आहे. तर मुलांना निश्चित तिकीटच्या अर्धी तिकीट राहणार आहे. 

महापालिका परिवहन बससेवा रविवार पासून रस्त्यावरून धावणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका बस डेपो, चार्जिंग स्टेशन, चालक व वाहक सज्ज आहेत. केंद्राने चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटीचा निधी दिला आहे. तर केंद्राकडून बस डेपोसाठी १५ कोटी ३० लाख व डेपोच्या नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात साठी ३ कोटी मंजूर झाला. तसेच केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे. महापालिका परिवहन बस सेवेमुळे कमीतकमी १ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही बोलले जाते. 

रविवारी महापालिका परिवहन बस रस्त्यावर धावणार महापालिकेने खाजगी ठेकेदाराद्वारे सुरू केलेली परिवहन बस सेवा गेल्या ७ वर्षांपूर्वी बंद पडली होती. अखेर महापालिकेने खरेदी केलेल्या एसी-नॉनएसी बस रविवार पासून लोकार्पणनंतर रस्त्यावर धावणार असून नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर